कसई दोडामार्ग : ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची असून यातील विजय महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांची खरी ताकद या निवडणुकीत दिसून येणार आहे. तसेच येथील विरोधकांमध्ये विकास करण्याची धमक नसल्याचे काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी दोडामार्ग येथे सांगितले.दोडामार्ग येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बाळा गावडे, प्रचार समितीचे सदस्य मधुकर भावे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, विकास सावंत, तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, विकास सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप कुडतरकर, अंकुश जाधव, एकनाथ नाडकर्णी, रमेश दळवी, चंदू मुळीक, संध्या प्रसादी आदी उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या विश्वासावर, प्रेमावर निवडणुका जिंंकल्या. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, असे सांगतानाच राणे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मी ज्यांना मोठे केले त्यांनी सरड्याप्रमाणे रंग बदलले. गद्दारी करून आपले खरे रूप दाखविले आहे, अशी टीका राजन तेली यांचे नाव न घेता केली. शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर हे आज एका, उद्या दुसऱ्या पक्षात उडी मारत आहेत. आमदारकीच्या कालावधीत त्यांनी काय विकास केला? दहशत आहे म्हणून माझ्यावर टीका करतात, अशा शब्दात केसरकरांना फटकारले.दिल्लीत भाजपाचे सरकार आहे. परंतु मोदींनी ‘अच्छे दिन’ आणण्याऐवजी बुरे दिन आणले आहेत. ३० टक्के महागाई वाढविली. यावर मात्र मोदी आणि भाजपचे नेते बोलत नाहीत. कांंदा आणि डाळंबीची निर्यात बंद केल्याने कांदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अमेरिकेत जाऊन जनतेसमोर भावना मांडून, हिंदीत भाषण करून उद्योगपतींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, हा देखावा आहे. (वार्ताहर)
राणेंकडून विरोधकांचा समाचार
By admin | Updated: October 6, 2014 22:35 IST