शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना विकास म्हणजे काय हेच माहित नाही

By admin | Updated: October 2, 2014 22:24 IST

नारायण राणे यांचा आरोप : कसाल येथे काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

ओरोस : मला कुणीही स्पर्धक नाही. विरोधकांमध्ये ती कुवत नाही. त्यांना विकास म्हणजे काय माहित नाही, अशी टीका उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कसाल येथील प्रचार सभेत केली.कसाल बाजारपेठ येथे काँग्रेसची प्रचारसभा व विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोकण सिंचन पाटबंधारे मंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी जिल्हा परिषद सभापती अस्मिता बांदेकर, कुडाळ काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश मोर्ये, संजय पडते, राजन परब, कसाल विभागप्रमुख सुभाष दळवी, बापू पाताडे, व्हिक्टर फर्नांडिस, सचिन कदम, सरपंच नीलेश कामतेकर, उपसरपंच सुलभा परब व इतर उपस्थित होते.राणे पुढे म्हणाले की, मी मत मागायला आलो नाही. लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. कोकणी जनतेच्या आशीर्वादाने सर्व पदे मिळाली. कोकण एकेकाळी मनिआॅर्डरवर चालायचा. आता आर्थिक प्रगती झाली आहे. शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. इंजिनिअरिंग कॉलेज, पशुवैद्यकीय महाविद्यालये आणि आता पडवे गावात मेडिकल कॉलेज होत आहे. जानेवारी महिन्यात चिपी येथे विमान उतरेल. विमान चालविणारे पायलट सिंधुदुर्गात तयार होतील. दहावी, बारावी उत्तीर्ण झालात की शिपाई पदासाठी नोकरीच्या मागे लागता. मोठे अधिकारी व्हा. विकास विरोधकांना जमेल का? असा प्रश्नही राणे यांनी यावेळी उपस्थित केला. आपण शिक्षण कमी असलेल्या विनायक राऊत यांना निवडून दिलेत. त्यांना विकास म्हणजे कळतो का? प्रकल्प कसे आणायचे ते माहित आहे का? दोडामार्ग येथे एम.आय.डी.सी. प्रकल्प मंजूर केला आहे. तो पूर्ण होईल असेही राणे म्हणाले.यावेळी संदेश पारकर, अस्मिता बांदेकर यांनी विचार व्यक्त केले. संतोष कदम यांनी आभार मानले. यावेळी कसाल येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)