रत्नागिरी : महसूलमंत्री एकनाथ खडसे दि.२२ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दापोली येथे होणाऱ्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या इंडो इस्त्रायल आंबा केंद्राचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होणार आहे.दुपारी १२ ते १ वाजता विद्यापीठाच्या विविध योजनांची पाहणी करणार आहेत. दुपारी १ ते २ वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ विश्रामगृह, दापोली येथे राखीव असून त्यानंतर ते कोल्हापूरकडे रवाना होणार आहे. महसूलमंत्री खडसे या बैठकीत महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार असून या आंबा केंद्रामध्ये शेतकऱ्यांना संशोधनाबाबतची दिशा स्पष्ट केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
इंडो-इस्रायल केंद्राचे २२ला खडसेंच्याहस्ते उद्घाटन
By admin | Updated: May 19, 2015 00:30 IST