शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

गोळवण शाळेच्या डिजिटल सेवेचे उद्घाटन

By admin | Updated: March 28, 2016 23:58 IST

जिल्हा परिषद शाळा : लोकवर्गणीतून विज्ञान प्रयोगशाळा, कलादालन

बागायत : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळवण नं. १ येथे गोळवण गावातील ग्रामस्थांकडून सुसज्ज व परिपूर्ण असे कलादालन, डिजिटल रुम व विज्ञान प्रयोगशाळा लोकवर्गणी जमा करून बांधण्यात आली. या सेवेचे उद्घाटन मालवणचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. शाळेचे मुख्याध्यापक संतोष पाताडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी केंद्रप्रमुख भारती बेटे, सरपंच प्रज्ञा चव्हाण, उपसरपंच सुभाष लाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, बाबा परब, विजय चव्हाण, आनंदव्हाळचे सरपंच रवींद्र टेंबुलकर, कुणकावळेचे माजी सरपंच आनंद वराडकर, माजी शिक्षक अरुण गोसावी, मालवण तालुका शिक्षक संघटनेचे सचिव संतोष कोचरेकर, गोळवणचे पोलिसपाटील मोहन पवार, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष भाई चिरमुले, सदस्य एकनाथ चव्हाण, आंबेरी सरपंच मंगेश कांबळी, साबाजी गावडे, शिक्षक सौरभ पाटकर, अजित गायकवाड, संजय परुळेकर, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शाळेचे माजी विद्यार्थी असलेले व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी आपल्या काळातील शाळा व आताची शाळा पाहिली की आनंदाने डोळे भरून येतात, असे गौरवोद्गार काढले. मालवण तालुका विस्तार अधिकारी कैलास राऊत यांनीही या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळण्याकरिता आपण लागेल ती मदत करण्यास तयार आहोत, असे सांगितले.दत्तात्रय मुळीक म्हणाले की, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तसेच शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष व सदस्य तसेच शिक्षकवृंदाच्या कष्टानेच हे सर्व शक्य झाले. ही शाळा गोळवणपुरतीच नाही तर तालुका व जिल्ह्यातही कलादालन असलेली शाळा आहे. मालवण तालुका अशा शाळांमुळे आघाडीवर असल्याचे स्पष्ट केले. धनाजी चव्हाण यांनी आभार मानले. (वार्ताहर)