शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

केवळ नऊ महिन्यात ११ खून, ३७ बलात्कार

By admin | Updated: November 9, 2015 23:22 IST

रत्नागिरी जिल्हा : आवळतोय गुन्हेगारीचा विळखा

राजेंद्र यादव-- रत्नागिरी -वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणाबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे विदारक चित्र उघडकीस येत आहे. गेल्या नऊ महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात ११ खून झाले असून, ३७ महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय चोऱ्या, दरोडे व घरफोड्यांमध्ये वाढ झाली आहे.राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. पोलिसांच्या दृष्टीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्हे हे तणावमुक्त जिल्हे म्हणून ओळखले जायचे. आता मात्र ही ओळख पुसली जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचार, चोरी, घरफोडी व खून यांसारख्या गंभीर गुन्ह्याच्या प्रमाणात गेल्या नऊ महिन्यात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या अवघ्या नऊ महिन्यात बलात्काराचे ३७ गुन्हे संंबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. सन २०१४मध्ये ही संख्या ३५ इतकी होती. जिल्ह्यातील गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यापासून अन्य गुन्ह्यांची संख्या १३१२ इतकी आहे. गतवर्षी ती १४४९ इतकी होती. २०१४ मध्ये खुनाचे ११ गुन्हे दाखल होते. चालू वर्षी नऊ महिन्यामध्ये खुनाचे ११ गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न झाल्याच्या घटना १० झाल्या आहेत, तर सदोष मनुष्य वधाखाली दोन गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी दोन दरोडे पडले, तर या नऊ महिन्यांमध्ये चार दरोडे पडल्याची नोंद आहे. एकूण जबरी चोरीच्या घटना ३९ घडल्या, तर ८८ घरफोड्या झाल्या आहेत. चोरीच्या २५१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गर्दी, मारामारीप्रकरणी ६७ गुन्हे नोंद आहेत.याशिवाय दुखापतप्रकरणी १३१ गुन्हे दाखल आहेत. वाहनांचा प्राणांतिक अपघात व अन्य गुन्हे धरुन हा गुन्ह्यांचा आकडा १३१२ इतका नोंद झाला आहे.गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ : शांत रत्नागिरीची ओळख बदलतेयगुन्हेगारी वाढण्यामागे झपाट्याने होणारे शहरीकरण हेच कारणीभूत असल्याचे प्रामुख्याने पुढे येत आहे. अर्थात गुन्हेगारी घटनांची संख्या वाढली असली तरी रत्नागिरीत टोळीयुद्धाच्या घटना घडत नाहीत, ही महत्त्वाची बाब. तेवढ्याबाबत रत्नागिरी जिल्हा शांत आहे. मात्र गुन्हेगारी घटना रोखण्याचे पोलिसांसमोरील आव्हानही मोठे आहे.परप्रांतीय अधिकरत्नागिरी जिल्ह्यात दरोडे, चोरीच्या घटनांमध्ये परप्रांतीयच जास्त गुंतल्याचे दिसून येते. चोऱ्यांच्या गुन्ह्यात अनेक आरोपी हे परजिल्ह्यातील असल्याचे दिसून आले. काही चोऱ्यांचा तपास अजूनही पूर्ण व्हायचा आहे.