शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांचाच अनेक गावांवर अन्याय

By admin | Updated: October 15, 2015 00:53 IST

काका कुडाळकर यांचा आरोप : पर्यटन विकास आराखड्यातून भाजपलाही वगळले

कुडाळ : जिल्ह्यातील काही गावांचा पर्यटनदृष्ट्या विकास करताना पालकमंत्र्यांनी अनेक गावांवर अन्याय केला आहे. तसेच ही गावे ठरविण्याच्या बैठकीला भाजप पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी विश्वासात घेतले नाही, असे आरोप भाजपचे काका कुडाळकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रसिद्धीपत्रकातून केले आहेत.कुडाळकर यांनी म्हटले आहे की, भाजपचे नेते व राज्याचे राज्यमंत्री रामराजे शिंदे यांनी ६ आॅक्टोबरला बोलाविलेल्या बैठकीनुसार काही गावांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती. ही बैठक भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिलेल्या पत्रानुसारच घेण्यात आली होती. असे असताना जिल्ह्यातील काही गावांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ज्या गावांची निवड केली आहे, ती पाहता त्यांनी बऱ्याच गावांवर अन्याय केल्याचे चित्र दिसत आहे. राज्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या या संदर्भातील बैठकीत जिल्ह्याचा पर्यटन विकासाचा आराखडा कसा असावा, याबाबत चर्चा व निर्णय झाले. त्यामुळे याबाबत या बैठकीला पालकमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे होते. मात्र, त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचे कुडाळकर यांनी म्हटले आहे. कुडाळ हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून या तालुक्यातील १७ गावांची निवड झाली. मात्र, कुडाळ शहराचा पर्यटन विकास आराखड्यात समावेश नसल्याने काका कुडाळकर यांनी खेद व्यक्त केला आहे. कुडाळ हे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर आहे. येथे भुईकोट किल्ला आहे. घोडेबाव, साई मंदिर, श्री देव कुडाळेश्वर मंदिर, भंगसाळ नदी येथील पांडवकालीन घाट, देवाचा डोंगर तसेच इतरही पर्यटनदृष्ट्या आवश्यक अशी ठिकाणे आहेत. तसेच रेल्वेस्थानक, चिपी विमानतळही जवळ आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे हे शहर पर्यटन विकास आराखड्यात सामील करावे, अशी विनंती पालकमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)आम्ही निधी आणणारया जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे कुडाळ शहर नव्हे, तर या जिल्ह्यातील जी गावे पर्यटनदृष्ट्या विकसित होणे गरजेचे आहेत, त्यांचे प्रस्ताव तयार करून भाजपचे नेते विनोद तावडे व रामराजे शिंदे यांच्यामार्फत आम्ही निधी आणणार, असा निर्धारही कुडाळकर यांनी केला.