शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पर्यटन जिल्हा करण्याची केवळ घोषणाच?

By admin | Updated: February 15, 2016 01:18 IST

रत्नागिरी जिल्हा : पुढाऱ्यांच्या घोषणा केवळ हवेतच

रत्नागिरी : गोव्याइतकीच पर्यटनाची क्षमता असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याकडे पर्यटन वृध्दिच्या दृष्टीने दुर्लक्ष झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरीलाही पर्यटन जिल्हा बनविण्याच्या घोषणा याआधीही अनेक पुढाऱ्यांनी केल्या आहेत. राज्यमंत्री राम शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात रत्नागिरीत या घोषणेचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे घोषणांनी रत्नागिरीकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आतातरी राजकीय नेत्यांनी थांबवावा आणि दिलेल्या वचनाला जागावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असताना सध्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा, तर रत्नागिरी जिल्ह्यास फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित केले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन जिल्हा म्हणून उशिराने का होईना विकास होत आहे. तेथे राजकीय वजन असलेले नेते आहेत. गोवा जवळ असल्याने पर्यटनवाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा चांगला फायदा झाला. मात्र, रत्नागिरीकडे राजकीय नेत्यांचे पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. केवळ गणपतीपुळेसह काही ठिकाणेच विकसित करण्याचा प्रयत्न झाला. परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक भागामध्ये पर्यटनाची क्षमता आहे. त्याकडे आजवर राजकीय नेत्यांचा व शासनाचेही दुर्लक्ष झाल्यामुळे रत्नागिरीच्या विकासाची गती मंदावली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या उंचच उंच रांगा आणि पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र असल्याने जिल्ह्याच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. डोंगर दऱ्या, स्वच्छ समुद्र किनारे, सुंदर नागमोडी वळणाच्या नद्या, उन्हवरे, आरवली, तुरळ येथील गरम पाण्याचे झरे, राजापूरमध्ये प्रकट होणाऱ्या गंगेचे ठिकाण, जंगले आणि परशुराम, प्रचितगड, मार्लेश्वर यांसारखे पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे धबधबे, पन्हाळेकाजी गुंफा, पाटपन्हाळे व बावनदी व्हॅली, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मार्लेश्वर, हेदवी, हातीस, परशुराम व राजापूर ही धार्मिक ठिकाणे, रत्नागिरीचा ऐतिहासिक थिबा राजवाडा, केळशी, मुरुड, गुहागर, पालशेत, गणपतीपुळे व वेळणेश्वर, मांडवी अर्थात गेटवे आॅफ रत्नागिरी, भाट्ये, गुहागर, आंजर्ला आदी समुद्र किनारे तसेच रत्नदुर्ग, जयगड, हर्णै, पूर्णगड हे सागरी किल्ले, असंख्य किल्ले, मोठे पाटबंधारे प्रकल्प, घाट अशा विपुल निसर्गसौंदर्याने रत्नागिरी जिल्हा नटलेला आहे. राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना या निसर्ग सौंदर्याचा भरभरून आस्वाद घेता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील विविधतेत पर्यटनाची पुरेपूर क्षमता असतानाही ही क्षमता विकसित करण्याकडे स्थानिक नेतृत्व आणि शासनानेही उदासिनताच दाखवली आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनविषयक प्रबोधन, जाणीवा जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतर ठराविक पर्यटन केंद्रांच्या विकासासाठी निधीची उपलब्धता करणे म्हणजे पर्यटन विकास म्हणता येणार नाही. (प्रतिनिधी)प्रयत्नच नाहीत...लोकप्रतिनिधींनी पर्यटनासाठी निधी आणण्यासाठी किती प्रयत्न केले, किती निधी सर्वसमावेशक पर्यटन विकासासाठी आला, हा संशोधनाचा विषय आहे. आराखडा हवा : पर्यटन क्षमतेचा वापर कधी?जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा विचार करता प्रत्येक तालुक्यात पर्यटन विकासाची मोठी क्षमता आहे, हे लपून राहात नाही. गणपतीपुळे, पावस, हर्णैसारखी काही ठिकाणे पर्यटनदृष्ट्या विकसित झाली, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या स्थळांच्या ठिकाणी आणखीही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतील तर ती त्याहून चांगली बाब आहे. मात्र, एवढ्या पर्यटन स्थळांच्याच विकासाने जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेचा वापर होणार नाही. स्थानिकांना रोजगार मिळणार नाही. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी, या जिल्ह्याच्या खासदारांनीही केवळ जिल्ह्याचा सर्वसमावेशक पर्यटन विकास व्हावा, यासाठी एकत्र येऊन त्याचा आराखडा बनवून त्यासाठी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवण्याचीही तितकीच गरज आहे.