शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एक निलंबित, दुसऱ्याची बदली

By admin | Updated: April 9, 2015 00:01 IST

वाहनधारकांकडून पैसे घेतले : पोलीस अधीक्षकांची कारवाई

सिंधुदुर्गनगरी : विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फणसगाव चेकनाक्यावरील पोलीस कर्मचारी एका वाहनधारकाकडून पैसे घेत असल्याचा व्हिडीओ पाहून सखोल चौकशीअंती पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण याची भूमिका संशयास्पद असल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. तर त्याचवेळी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे पोलीस नाईक सुनील पवार यांच्यावर बदलीची कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी दिली. फणसगाव चेकनाक्यावर पोलीस कर्मचारी एका व्यक्तीकडून पैसे घेत असल्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते. हे चित्रीकरण जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांना पाठविण्यात आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांची नेमणूक केली होती. (पान १ वरून) त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून ३ एप्रिलला पोलीस अधीक्षकांना याबाबतचा अहवाल सादर केला होता. तर पोलीस अधीक्षकांनी संबंधित दोघांना बोलावून घेऊन त्यांची चौकशी केली होती.प्राप्त झालेले व्हिडीओ चित्रीकरण आणि पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या अहवालानुसार पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण याची संशयास्पद वागणूक दिसून आली. या प्रकरणी चव्हाण याला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बुधवारी निलंबित केले, तर त्याच्यासोबत असलेले पोलीस कर्मचारी सुनील पवार यांच्याकडून कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बदलीची कारवाई केली.याबाबत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर म्हणाले की, ज्या पत्रकाराने जागरुकता दाखवून या घटनेचे चित्रीकरण केले त्याचे मी अभिनंदन करतो. चुकीच्या कामांना आळा बसावा यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी प्रदीप चव्हाण याची खातेनिहाय चौकशी करण्यात येणारएक निलंबित, दुसऱ्याची बदली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाविस्कर यांनी दिली. (प्रतिनिधी)‘लोकमत’मध्ये प्रथम वृत्त‘पैसे घेताना दोघा पोलिसांचे चित्रीकरण’ असे वृत्त ‘लोकमत’ने रविवारी (दि. ५ एप्रिल) सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बुधवारी त्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे ते वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.