शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत एकांकिका स्पर्धा

By admin | Updated: January 20, 2015 00:03 IST

२४ जानेवारीपासून सुरुवात : नाथ पै संस्थेतर्फे आयोजन

कणकवली : नाथ पै एकांकिका स्पर्धेची शालेय गटाची स्पर्धा २४ ते २६ जानेवारी या कालावधित कणकवली येथे होणार आहे. यावर्षी शालेय गटात नऊ संघांनी आपला सहभाग निश्चित केला असून, यामध्ये आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ यांची ‘झाली काय गंमत’, शिंदे अकॅडमी, कोल्हापूर यांची ‘गणपती बाप्पा हाजीर हो’, बाबा वर्दम थिएटर्स कुडाळची ‘नवे गोकुळ’, श्री आदर्श विद्यालय कोथळी, कोल्हापूरची ‘लाडूशेठ वाट्टोळा’, पूर्ण प्राथमिक शाळा कसबा वाघोटणची ‘काखेत कळसा गावाला वळसा’, आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरे यांची ‘राक्षस तुमच्या घरात’, अक्षरसिंधू कलामंच कणकवलीची ‘क्लोन’, युरेका सायन्स क्लब कणकवलीची ‘आली रे आली दहावी आली’, शिरगाव हायस्कूल, शिरगाव यांची ‘कुलूप’, अशा एकांकिका सादर होणार आहेत.नाट्यचळवळीच्या सकस वाढीसाठी संस्थेने स्पर्धेच्या स्वरूपात वेगवेगळ्या टप्प्यांवर बदल केले. जसे स्पर्धेच्या १५ व्या वर्षी ‘दिग्दर्शीय टिप्पणी’ २१ व्या वर्षी स्पर्धा ‘प्राथमिक व अंतिम फेरी’, अशा दोन स्तरावर आयोजित करणे, तर ३१ व्या वर्षी स्पर्धेचे स्वरूप बाजूला ठेवून ‘लेखककेंद्री एकांकिका महोत्सव’ घेण्यास प्रारंभ केला. हे बदल करण्यामागचा उद्देश नाट्यचळवळीचा विकास व्हावा व रसिकांना दर्जेदार कलाकृती पाहता याव्यात हाच होता. यादृष्टीने यावर्षीपासून ‘नाथ पै सरस एकांकिका स्पर्धा’ आयोजित करण्याचे संस्थेने ठरविले होते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या एकांकिकांची स्पर्धा घेण्याचे संस्थेने निश्चित केले. परंतु जिल्ह्यातील अथवा जिल्ह्याबाहेरील पारितोषिकप्राप्त संघांनी अंतिम तारखेपर्यंत आपला सहभाग नोंदविला नाही. क्षीण प्रतिसादामुळे खुल्या गटातील ही स्पर्धा तूर्तास रद्द करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.या कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. (प्रतिनिधी)