शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

घराला लागलेल्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू; चौके येथे मंगळवारी रात्री घडली घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2024 11:38 IST

ते गेली बरीच वर्षे पत्नी मुलांपासून बाजूला घराच्या मागील पडवीत अलिप्त राहत होते. 

संदीप बोडवे, लोकमत न्यूज नेटवर्क, मालवण : तालुक्यातील चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने घरात वास्तवव्यास असलेले दीपक सखाराम परब (बावकर) (५५) यांचा अगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. चौके स्थळकरवाडीत राहणारे दीपक सखाराम परब (बावकर) हे गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. ते गेली बरीच वर्षे पत्नी मुलांपासून बाजूला घराच्या मागील पडवीत अलिप्त राहत होते. 

मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे आपल्या घरी असताना अचानक घराच्या मागील पडवीत आग लागून घराने पेट घेतला. यावेळी आजूबाजूच्या घरातील लोकांनी पडवीचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाज्याला आतमधून कडी असल्यामुळे आणि आगीने मोठा पेट घेतल्याने खोलता आला नाही. पडवीतून आगीचे लोळ येत होते. याबाबत चौके पोलिस पाटील यांना कल्पना देण्यात आली. पोलिस पाटील यांनी घटनास्थळी येत मालवण पोलिस ठाणे येथे संपर्क साधत घटनेची माहिती दिली. आग आटोक्यात येत नसल्याने अखेर मालवण नगरपालिका अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले. सुमारे तासभर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. यानंतर पडवीत पूर्णपणे जळलेल्या अवस्थेतील दीपक यांचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी रुग्णवाहिनीने मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला. 

यावेळी घटनास्थळी मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलिस कॉन्स्टेबल जानकर, प्रतीक जाधव, महादेव घागरे, हेमंत पेडणेकर, चौके पोलिस पाटील रोहन चौकेकर उपस्थित होते. आग नेमकी कशी लागली हे समजण्यात आले नाही. 

पुढील तपास मालवण पोलिस करत आहेत. यावेळी प्रीतम गावडे, मंदार गावडे, बंड्या गावडे, प्रतीक गावडे, मोहन गावडे, भाई गावडे यांच्यासह अनेक युवकांनी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. जळालेल्या मृत दीपक (बावकर) यांचा मृतदेह बाहेर काढण्यास सहकार्य केले. दीपक परब यांच्या पच्छात पत्नी, २ मुलगे, बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Malvan police stationमालवण पोलिस स्टेशन