शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण इमारतींना मिळणार नवे रूप

By admin | Updated: June 18, 2015 22:37 IST

४७ लाखांचा निधी दुरुस्तीसाठी मंजूर : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील इमारती

कणकवली : विशेष इमारत दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पंचायत समिती स्तरावरील इमारतींच्या दुरुस्तीसाठी ४७ लाख ४५ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमध्ये कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण, वैभववाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे जीर्ण इमारतींना नवे रूप प्राप्त होणार आहे.जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या परंतु पंचायत समिती अथवा सार्वजनिक बांधकाम उपविभाग तसेच विश्रामगृहासाठी वापरण्यात येत असलेल्या अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. विविध तालुक्यातील अशा इमारतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नसल्यामुळे या इमारती अनेक वर्षे नादुरुस्त अवस्थेत वापरल्या जात आहेत. अनेक इमारतींची छप्परे मोडकळीस आली असून, पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडून इमारत दुरुस्तीसाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील आठ इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंता यांच्याकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निधी मंजुरीचे आदेश प्राप्त झाले आहेत. लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. विशेष दुरुस्ती इमारत कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक निधी कणकवली पंचायत समितीच्या आवारातील इमारतींसाठी प्राप्त झाला आहे. त्यामुळे कणकवली बांधकाम उपविभागाच्या रेकॉर्ड रुमचे छप्पर दुरुस्त करणे, उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कणकवली यांचे निवासस्थान दुरुस्ती व नूतनीकरण, उपअभियंता कार्यालय इमारतीची दुरुस्ती तसेच कणकवली पंचायत समिती कार्यालयाच्या इमारत दुरुस्तीलाही मंजुरी देण्यात आली आहे. वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालय इमारत दुरुस्ती, मालवण विश्रामगृह इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण, सावंतवाडी पंचायत समितीच्या लघुपाटबंधारे कार्यालयाच्या रेकॉर्ड रुमची दुरुस्ती, वैभववाडी शासकीय विश्रामगृहाची अंतर्गत सजावट व नूतनीकरण या कामांसाठी एकत्रितपणे ४७ लाख ४५ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून इमारतींचे छप्पर, अंतर्गत सजावट, रंगकाम, दरवाजे, खिडक्यांची दुरुस्ती, विद्युतीकरण, फरशी नूतनीकरण अशी कामे करण्यात येणार आहेत. (वार्ताहर)निधी मंजुरीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंता यांच्याकडून जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे निधी मंजुरीचे आदेश प्राप्त झाले आहेत. लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळ्यानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार. विशेष दुरुस्ती इमारत कार्यक्रमांतर्गत सर्वाधिक निधी कणकवली पंचायत समितीच्या आवारातील इमारतींसाठी प्राप्त.