शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

कळंबणी गावात वृद्धाचा खून

By admin | Updated: January 31, 2016 01:15 IST

कोयत्याने प्रहार

खेड : खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक गावडेवाडी येथील तुकाराम सखाराम गावडे (वय ७२) या वृद्धाचा धारदार हत्याराने अमानुष खून करण्यात आला. शनिवारी पहाटे गावडे यांचा मृतदेह आढळल्याने हा खून उघडकीस आला. तुकाराम गावडे हे रानात जळावू लाकडे तोडण्यासाठी जात असत़ २९ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता जळणाकरिता लाकडे तोडण्यासाठी गेले होते़ ते परत आलेच नाहीत. यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली; मात्र गावात तसेच शेजारील गावात त्यांचा शोध लागला नाही. यामुळे त्यांचा मुलगा राजाराम गावडे यांनी ते गेलेल्या गावातीलच बलदेव धरणाकडील भागात रात्रभर शोधाशोध केली. शनिवारी पहाटे साडेतीन वाजता तुकाराम गावडे मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मानेवर धारदार हत्याराने किंवा कोयत्याने प्रहार झाला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या मानेच्या मागील बाजूस हे वार करण्यात आले आहेत. आपल्या पित्याचा खून करण्यात आला असल्याची तक्रार राजाराम गावडे यांनी लागलीच खेड पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ३0२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी चिन्मय पंडित अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)