शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मोटार दरीत कोसळून वृद्ध दाम्पत्य ठार

By admin | Updated: May 16, 2016 00:37 IST

चौघे गंभीर : संगमेश्वर तालुक्यातील वांद्रीजवळ दुर्घटना; जखमी सर्व एकाच कुटुंबातील

देवरूख : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील वांद्रीजवळ अल्टो कार दरीत कोसळून एकाच कुटुंबातील दोनजण ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. रविवारी दुपारी पावणे दोन वाजता हा अपघात झाला. अपघातग्रस्त शिर्के कुटुंब मीरा रोडहून कुर्णे (लांजा) येथे आपल्या मूळ गावी चालले होते. बाळकृष्ण सखाराम शिर्के (वय ६०), राजश्री बाळकृष्ण शिर्के (५५) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध दाम्पत्याची नावे असून, गाडीतील अन्य आनंदा बाळकृष्ण शिर्के (३५), मधुरा आनंदा शिर्के (३०), हर्षली आनंदा शिर्के (४) व वर्णवी आनंदा शिर्के (३) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी शिर्के कुटुंबीय मीरा रोडवरून कोकणात सुटीसाठी आपल्या मूळ गावी कुर्णे येथे अल्टो कार (एमएच-४ जीजे ३१५८)ने चालले होते. दुपारी १.३० च्या दरम्यान ते वांद्री येथील सप्तलिंगी नदीपुलाजवळ आले असता त्यांची मोटार विरुद्ध दिशेला जाऊन १५ फूट खोल दरीत कोसळली व शेवटी ती एका झाडावर आदळली. अपघाताचे वृत्त कळताच नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्याचे चालक धनेश केतकर यांनी वाहतूक पोलिस, स्थानिकांच्या मदतीने मृत व जखमींना दरीतून बाहेर काढले. त्याचदरम्यान शासनाची १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी आली. दोन्हींतून मृतदेह व जखमींना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी सारे दृश्य हृदयद्रावक होते. आजी-आजोबांचा जागीच झालेला मृत्यू, मुलांनी फोडलेला टाहो बघ्यांचे हृदय पिळवटून टाकत होता. (प्रतिनिधी)