शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील विस्थापित व्यापारी आक्रमक

By admin | Updated: January 12, 2016 00:31 IST

महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न : प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना कणकवली शहरात सिंगल पिलर ओव्हर ब्रिज मंजूर करावा किंवा बायपासच्या मागणीचा प्राधान्याने विचार व्हावा. ही मागणी मान्य न झाल्यास मानवी हक्क आयोगाकडे दाद मागण्याबरोबरच वेळप्रसंगी उपोषणासारखे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे प्रांताधिकारी संतोष भिसे यांना देण्यात आला आहे. दरम्यान, महामार्गाच्या चौपदरीकरणावरुन कणकवलीतील विस्थापित होणारे व्यापारी आक्रमक झाले आहेत.कणकवली शहरातून प्रस्तावित असलेल्या महामार्ग चौपदरीकरणामुळे व्यापाऱ्यांची दुकाने, व्यवसाय, राहती घरे नष्ट होणार आहेत. तसेच व्यापाऱ्याबरोबर सुमारे १५00 पेक्षा अधिक नागरिक विस्थापित होणार आहेत. यासाठी या व्यापाऱ्यांनी विस्थापित व्यापारी समिती बनविली आहे. तसेच या समितीच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी कणकवली शहरातून एकत्रितपणे चालत जात प्रांताधिकारी संतोष भिसे यांची कार्यालयात भेट घेण्यात आली. तसेच त्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विविध समस्यांकडे प्रांताधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.यावेळी विस्थापित व्यापारी समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर, अनिल शेटये, सुभाष काकडे, राजू सावंत, प्रसाद कोरगावकर, विलास कोरगावकर, बाळा बांदेकर, सुहास हर्णे, अनिल मांजरेकर, नितिन केळूसकर, संजय मालंडकर, नाना जाधव, रामदास मांजरेकर, महेश लाड, सुहास परब आदी उपस्थित होते.यावेळी संतोष भिसे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने महामार्ग चौपदरीकरणाचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार राष्ट्रीय स्तरावर आहेत. या कामासाठी लागणाऱ्या जमिनीचा सर्व्हे करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जमिनीचे गट नंबर प्रसिध्द केले आहेत. ही जमिन संपादित करण्यासाठी माझी नियुक्ती झाली आहे. मात्र, आराखड्यात बदल करण्याचे अधिकार माझ्याकडे नाहीत. माझ्याकडे उपलब्ध होणारी माहिती तुम्हाला वेळोवेळी देण्यात येईल. त्यामुळे तुमच्या मागण्यांचे निवेदन संबधित विभागाकडे पाठवितो, असेही भिसे यावेळी म्हणाले. (वार्ताहर)