शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा अधिकाऱ्याविरोधात गुन्हा

By admin | Updated: July 16, 2014 23:15 IST

लाखोंचा अपहार : गोविंद टिळवेंनी दिली माहिती

सावंतवाडी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सन २००६ ते २०१२ या कालावधीत लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी जे. पी. आदाणे, तत्कालीन प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी सय्यद साजिद हुसेन व बा. बा. क्षीरसागर या तिघांविरोधात गोविंद उर्फ भाई गणेश टिळवे यांनी ओरोस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ओरोस पोलिसांनी याबाबत तिन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहितीही टिळवे यांनी देत या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत गोविंद टिळवे यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी टिळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार ओरोस येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून लाखो रुपयाचा अपहार झाला असून हा अपहार संगनमताने खोट्या पावत्या देत कार्यालयीन अभ्यास न करता स्वत:च्या फायद्यासाठी केलेला आहे.टिळवे म्हणाले, सामाजिक कार्य करताना जिल्ह्यातील अपहाराविरोधात आवाज उठविणे कर्तव्य मानतो. जिल्हा क्रीडा कार्यालयातील अपहाराचा सुगावा लागताच माहितीच्या अधिकारातून कागदपत्रे जमा करुन हा घोटाळा समोर आणला आहे. यामध्ये दोषींनी संगमताने गेली कित्येक वर्षे अपहार केल्याचे दिसून आले आहे. मात्र, २००६ ते २०१२ या कालावधीतील अपहाराचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पुराव्यांच्या सहाय्याने जे. पी. आदाणे, सय्यद हुसेन, बा. बा. क्षीरसागर या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याआधी क्रीडा कार्यालयातील तृतीय श्रेणी अधिकारी पी. एस. चव्हाण यांनीही या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यांची बदली चंद्रपूरला करुन हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून झाल्याचेही टिळवे यांनी सांगितले. गुन्ह्याच्या तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे व पोलीस निरीक्षक पी. जे. चौधरी करत आहेत. गुन्हा निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. क्रीडा कार्यालयाकडून एक हजार बनावट पावत्या केल्या आहेत. आॅडिटही झाले नसून यासाठी कोणाला जबाबदार ठरवावे, याची विचारणा टिळवे यांनी क्रीडा विभागाच्या वरिष्ठांकडे पत्राव्दारे केली आहे. मात्र, उत्तर अद्यापही मिळाले नसल्याचे टिळवे यांनी सांगिंतले. (वार्ताहर)