शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतेच

By admin | Updated: November 30, 2015 01:10 IST

संगमेश्वर तालुका : आठ दिवसात चारजण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी

देवरुख : संगमेश्वर तालुका व परिसरातून बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. पोलिसांपुढेही हे एक आव्हान आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये एक शिक्षक, दोन विद्यार्थी आणि एक शिपाई बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.या तक्रारींमध्ये कसबा हायस्कूलचे शिक्षक सईद पिरजादे आणि कडवई वसतिगृहातील विद्यार्थी सलमान बुड्ये हे दोघे बेपत्ता असल्याच्या तक्रारींपाठोपाठ अंत्रवली येथील एक विद्यार्थी ओंकार संतोष मोहिते आणि पैसाफंड इंग्लिश स्कूलचा शिपाई सीताराम जाधव असे एकूण चौघेजण बेपत्ता आहेत. यात वसतिगृहातील विद्यार्थी सलमान बुड्ये हा वसतिगृहात पुन्हा आल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांनी दिली आहे.पहिल्यांदा शिक्षक सईद पिरजादे हे दि. २४ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली. दि. २३ नोव्हेंबरपासून ते बेपत्ता आहेत. ते कोंडअसुर्डे (संगमेश्वर) येथील रहिवासी आहेत, तर कडवई वसतिगृहातील सलमान बुड्ये (१५) आणि ओंकार मोहिते (१६) हे दोघे दि. २६ रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तसेच मानसकोंडच्या फेपडेवाडीतील सीताराम गोपाळ जाधव (५३) हे देखील दि. २६ पासून बेपत्ता आहेत. ते सकाळी ५ वाजता चेंबूरहून गावी निघाले होते. मात्र, ते गावी न आल्याने शोधाशोध करण्यात आली. याबाबत त्यांच्या मुलीने चेंबूर (गोवंडी) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पिरजादे हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी १० वाजता घरातून आपल्या मोटारसायकलवरून कसबा शाळेत जातो, असे सांगून घराबाहेर पडले. शिक्षक पिरजादे हे दुपारी जेवणासाठी घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने शाळेत संपर्क साधला असता ते शाळेत आले नसल्याचे समजले. घाबरलेल्या पत्नी कौसर यांनी शेजाऱ्यांना ही घटना सांगितली. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. (प्रतिनिधी)रहस्य वाढले : पिरजादेंचे नातेवाईक धास्तावलेशाळेत जातो, असे पाच दिवसांपूर्वी सांगून बाहेर पडलेले आणि गूढरित्या बेपत्ता झालेल्या संगमेश्वरजवळच्या कसबा न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक सईद अब्दुल अजिज पिरजादे (४२) कोंडअसुर्डे यांचाही अद्याप शोध लागलेला नाही. सईद पिरजादे यांचा अजूनही शोध न लागल्याने त्यांचे नातेवाईक धास्तावले आहेत. मात्र, या प्रकरणातील रहस्य वाढतच असून, पिरजादेंना लवकरच शोधू, असा विश्वास संगमेश्वर पोलिसांनी व्यक्त केला आहे.भीतीचे सावटसंगमेश्वर तालुक्यात बेपत्ता होणाच्या प्रकारात वाढ होत असल्याने तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध अद्याप न लागल्याने परिसरात भीतीचे सावट आहे.