शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘माळीण’ची पुनरावृत्ती नको

By admin | Updated: December 16, 2014 23:44 IST

प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा : निर्णयाची अंमलबजावणी रखडली, डोंगरपायथ्याच्या जमिनी न स्वीकारण्याचा केला निर्धार

रत्नागिरी : जिल्ह्यातील धरणांमुळे बेघर झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत झालेल्या निर्णयानुसार अंमलबजावणी होत नसल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आपल्या न्याय्य मागण्यांबाबत जोरदार घोषणा देत हल्लाबोल केला. पुनर्वसन करताना त्यांना डोंगरपायथ्याच्या जमिनी नको. माळीणसारखी स्थिती जिल्ह्यात उद्भवणार नाही, अशा ठिकाणी पुनर्वसन करावे.मारुती मंदिरपासून पायी निघालेल्या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सभेत रुपांतर झाले. ‘तुमचे धरण आमचे मरण’, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्यालय प्रमुख संपत देसाई यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांना निवेदन सादर केले. यावेळी मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष दिलीप गायकवाड, पोयनार धरणग्रस्तांचे नेते सुरेश खानविलकर, शेलारवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी प्रवीण लांजेकर, जामदा प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम तोडकरी, अशोक आर्डे, प्रकाश आमकर, कळसवली कोष्टेवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी कृष्णा निम्हणकर उपस्थित होते. जिल्ह्यात २४ प्रकल्पांचे काम सुरू असून, भूसंपादन व पुनर्वसन शाखेतील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न रखडले आहेत. राजापूर तालुक्यातील जामदा प्रकल्पग्रस्तांचे संकलन रजिस्टर तयार करणे, पुनर्वसित गावठाणापासून आठ किलोमीटर्सच्या आत शेतजमीन उपलब्ध करून देणे, संपादित केलेल्या जमिनी मागणी करणाऱ्या शेतकरी प्रकल्पग्रस्तांना पसंतीनुसार दाखवण्यात याव्यात, अशा मागण्या आहेत. राजापूरमधीलच कळसवली-कोष्टेवाडी प्रकल्पग्रस्तांचा खास बाब पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठवावा. पुनर्वसनाच्या कामाबरोबरच धरणाचे काम सुरू करावे. संगमेश्वर तालुक्यातील गड मध्यम प्रकल्प, संगमेश्वर तालुक्यातील चांदोेली अभयारण्य प्रकल्प, खेडमधील शेलारवाडी लघु प्रकल्प व पोयनार प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या उर्वरित आवश्यकतांची पूर्तता करावी. वाटप झालेल्या जमिनींचे सातबारा मिळावेत, घरांचे बांधकाम झाल्यानंतर नावांची झालेली अदलाबदल दुरुस्त करून मिळावी अशा मागण्या अपर जिल्हाधिकारी निगुडकर यांच्यासमोर मांडल्या. (प्रतिनिधी)