शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शाळांवर आता ‘सीसीटीव्ही’ची नजर

By admin | Updated: April 27, 2016 00:58 IST

शासनाचा सक्तीचा आदेश : सिंधुदुर्गातील २१५ शाळांचा समावेश; विद्यार्थिनींची सुरक्षा बळकट होणार

गिरीश परब -- सिंधुदुर्गनगरी --शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराबाबत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवर ‘वॉच’ ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिंधुदुर्गातील खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले आहेत. शासनाच्या या धोरणात्मक निर्णयामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता बळकट होणार आहे. शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम सिंधुदुर्गाच्या माध्यमिक शिक्षक विभागाने सुरू केले आहे. या जिल्ह्यात असणाऱ्या २१५ खासगी शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा या आशयाचे पत्र व सूचना दिल्या गेल्या आहेत. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून सीसीटीव्हीची अंमलबजावणी सर्व खासगी शाळांमध्ये करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. शाळा तसेच उच्च माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जावे लागू नये आणि वेळीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला बळकटी देता यावी यासाठीचा शासनाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याचे सांगितल जाते.सीसीटीव्हीचा सहा महिन्यांपासून आढावा घेणे बंधनकारक जिल्ह्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याबाबत खात्री करून सर्व माहिती गोळा करून ती विभागीय शिक्षण उपसंचालकांना सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक सहा महिन्यांनी सीसीटीव्हीचा आढावा घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. खासगी शाळांमध्ये आपला मुलगा जमेल ती फी देऊन शिकविण्यास पाठविणाऱ्या पालकांनी शासनाच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. कारण शाळांमधील घडणाऱ्या घटनांची माहिती आता सीसीटीव्हीत कैद होणार आहे.