शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा

By admin | Updated: December 2, 2014 21:27 IST

कासार्डे ग्रामपंचायतीची कारवाई : सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी दिली एक दिवसाची मुदत

नांदगांव : वारंवार सूचना देऊनही कासार्डे पेट्रोलपंप परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी सांडपाण्याच्या निर्गतीची व्यवस्था केली नसल्याने सोमवारी कासार्डे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागामार्फत तीन हॉटेल व्यावसायिकांना सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिल्याची माहिती कासार्डे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रविण कुडतरकर यांनी दिली. कासार्डे पेट्रोलपंप परिसरात अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत. अनेक मोठी वाहने याठिकाणी नियमित थांबतात. मात्र, हॉटेलच्या सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नसून उघड्यावरच पाणी सोडले जात असल्याने आरोग्य विभागामार्फत यापूर्वी दोनदा नोटीसा देण्यात आल्या होत्या. तसेच कासार्डे ग्रामपंचायतीनेही स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनेच्या दृष्टीने २४ तासांची नोटीस देण्यात आली. मात्र, काही हॉटेल व्यावसायिकांकडून त्याबाबत गंभीर दखल घेतली गेली नाही. याबाबतचा विषय कासार्डे ग्रामपंचायतीच्या २६ नोव्हेंबरच्या ग्रामसभेत चर्चेला आला. त्यावेळी ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करावी व आवश्यक कारवाई करावी असे ठरविण्यात आले.ग्रामसभेतील ठरावानुसार सोमवारी सर्व हॉटेलांची पाहणी करण्यात आली. यावेळी तीन हॉटेलांचे सांडपाणी बाहेर सोडल्याचे निदर्शनास आले. या हॉटेल व्यावसायिकांना एक दिवसाची मुदत देण्यात आली असून या कालावधीत सांडपाण्याची व्यवस्था संबंधित हॉटेल व्यावसायिकांनी करायची आहे.या पाहणीवेळी सरपंच संतोष पारकर, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय शेट्ये, पंचायत समिती सदस्य संजय देसाई, बाळाराम तानवडे, आरोग्य सहाय्यक ठाकर, आरोग्यसेवक मांडवकर, ग्रामपंचायत सदस्य विजय कोलते, ग्रामविकास अधिकारी प्रविण कुडतरकर, ग्रामपंचायत कर्मचारी विद्याधर नकाशे, गणेश पाताडे, राजा सावंत, भाऊ शेट्ये व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)पुन्हा तीन हॉटेल व्यावसायिकांना नोटिसाकासार्डे पेट्रोलपंपाजवळील हॉटेल शिवसाई, हॉटेल कमल व हॉटेल दत्तकृपा या तीन हॉटेलांना एक दिवसाची नोटीस ग्रामपंचायतीकडून देण्यात आली. सोमवारी केलेल्या पाहणीत या तिन्ही हॉटेलांचे सांडपाणी बाहेर सोडलेले निदर्शनास आले. तसेच त्यांनी याबाबत नियोजन न केल्यास परवाने रद्द करण्याबाबत कारवाई करण्यात येईल असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.