शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

निवतीतील अनधिकृत बांधकामांना प्रशासनाकडून नोटीसा

By admin | Updated: February 2, 2016 21:10 IST

मच्छिमारांमध्ये घबराटीचे वातावरण : शासनाने घरांच्या जमिनीची घरमालकाला विक्री करून अथवा भाडेतत्वावर देण्याची मागणी

म्हापण : निवती बंदर येथील शासकीय जागेतील मच्छिमार व्यावसायिकांनी बांधलेली घरे शासनाने अनधिकृत ठरवून ती हटविण्याच्या नोटिसा काही लोकांना पाठवल्याने या घरांमध्ये राहणाऱ्या मच्छिमारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शासनाने या घरांसाठी वापरण्यात आलेल्या जमिनी घरमालकांना विक्री करून किंवा भाडे तत्त्वावर देण्याची मागणी मच्छिमारांमधून होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वेंगुर्ले तालुक्यातील मेढा ग्रामपंचायतीच्या कार्यकक्षेत येणारे निवती बंदर हे सिंधुदुर्ग जिल्हयातील एक प्रमुख व्यावसायिक बंदर आहे. येथून प्रतिवर्षी लाखो रूपयांची उलाढाल होते. गेल्या कित्येक वर्षांपासून हे मच्छिमार बांधव समुद्र किनाऱ्यावरील शासकीय जागेत आपली झोपडीवजा घरे बांधून राहतात. यातच ते आपले मच्छिमारी साहित्य ठेवतात. अशी १0८ घरे अस्तित्वात आहेत. यातील काही मोजक्याच घरांना शासनाने संरक्षण दिल्याचे समजते. उर्वरित घरांवर जर कारवाईचा बडगा उचलला गेला तर या सर्व मच्छिमारांचे संसार उघड्यावर पडणार आहेत. शासनाने या घरांसाठी वापरलेल्या जागांची घरमालकांना विक्री करावी अथवा या जागा भाडेतत्वावर कराराने द्याव्यात अशी मागणी येथील मच्छिमारांकडून होत आहे. सध्या मात्र, प्रशासनाने बजावलेल्या नोटीसीमुळे मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी) जागा उपलब्ध करून देण्याचा बाँड : मेतर ४शासनाने या मच्छिमार बांधवांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून यातून मार्ग काढावा अशी मागणी केली आहे. आपण मच्छिमार बांधवांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. ४शासनाला जेव्हा गरज भासेल तेव्हा स्वखर्चाने जागा उपलब्ध करून देऊ असा बाँड मच्छिमारांनी केला आहे. ४अशी माहिती ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य विजय मेथर यांनी दिली.