शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या सुविधांबाबत नाराजीचा सूर

By admin | Updated: April 22, 2016 01:01 IST

दोडामार्गमधील उन्हाळी पर्यटन : पर्यटनस्थळांच्या विकासाची गरज; उन्नेयी बंधारा, तिलारी धरण ठरतेय आकर्षण

वैभव साळकर-- दोडामार्ग -तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेला तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा व तिलारी धरण या दोन्ही पर्यटनस्थळांवर गेल्या महिन्याभरापासून पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यातीलच नव्हे, तर जिल्ह्याबाहेरील विशेषत: गोवा राज्यात येणारे देशी-विदेशी पर्यटकही या दोन्ही पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. मात्र, पर्यटनस्थळांवर असलेल्या अपुऱ्या पर्यटन सुविधांमुळे पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी, तालुक्यातील पर्यटनवाढीसाठी पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच पर्यटन सुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक बनले आहे.तिलारी प्रकल्पांतर्गत साकारलेला तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा व गोवा व महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी येथे साकारलेले कोकणातील सर्वांत मोठे मातीचे धरण ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांना विशेष आकर्षित करीत आहेत. पर्यटकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्या सहली, वनभोजनही त्या पर्यटनस्थळांवर गेल्या दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात येऊ लागली आहेत. तसेच दोडामार्ग तालुक्यालगतच गोवा राज्यात येणारे देशी-विदेशी पर्यटकही तिलारी येथील या पर्यटनस्थळावर पर्यटनासाठी येऊ लागल्याने दोडामार्ग तालुक्यातील पर्यटन वाढीची नांदीच आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. मात्र, या पर्यटनस्थळांवर जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, निवासाची सोय, शौचालये, चहापानाची, जेवणाची सोय, आदी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा पर्यटनस्थळांवर नसल्याने त्याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. जर तालुक्यातील पर्यटन वृद्धिंगत व्हायला हवे तर उपरोक्त सोयी-सुविधा पर्यटनस्थळी उपलब्ध असणे आवश्यक आहे. या पर्यटनस्थळांवर जाणारे रस्ते सुलभ होण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास तालुक्यातील पर्यटन वृद्धिंगत होण्यास वेळ लागणार नाही. तालुक्यातील तिलारी धरण व तेरवण-मेढे उन्नेयी बंधारा ही दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात भुरळ घालत आहेत. त्यामुळे या दोन्ही पर्यटनस्थळांचा प्राधान्याने विकास होणे आवश्यक आहे. तिलारी प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तिलारी प्रकल्पाकडूनही विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. तिलारी धरणाला मुबलक पाणीसाठा, सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा व धरणाच्या बुडीतक्षेत्रात असणारे रानटी हत्तींचे वास्तव्य त्यामुळे या दोन्ही पर्यटनस्थळांना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. हत्तींच्या वास्तव्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर तिलारी धरण पर्यटनस्थळाचे नाव पोहोचले आहे. तर निसर्गसौंदर्याने नटलेल्या तेरवण-मेढे उन्नेयी बंधाऱ्यासाठी असलेला मुबलक पाणीसाठा, सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या, सुंदर बगीचा, लहान मुलांंसाठी खेळण्याचे साहित्य व महाराष्ट्रातील सर्वांत छोटा अवघा दोन मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प असल्याने या ठिकाणी एकदा येणारा पर्यटक तेथीला सौंदर्याच्या मोहात पडल्यावाचून राहत नाही. साहजिकच तो पुन्हा या पर्यटनस्थळांवर आल्याशिवाय राहत नाही. दिवसेंदिवस या दोन्ही पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत आहे. मात्र, अपुऱ्या पर्यटन सुविधांमुळे येथे येणाऱ्या पर्यटकांत काहीशी नाराजीही व्यक्त होत आहे. सध्या सर्वत्र उन्हाळी सुटी सुरू झाल्याने येथील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत आहे. गेल्या महिनाभरात या पर्यटनस्थळांवर पाच हजारांपेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे. मात्र, त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची, शौचालय-मुतारी या अत्यावश्यक बाबींची उपलब्धता नसल्याने त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे एकंदरीत पर्यटनस्थळांवर अपुऱ्या पर्यटन सुविधांमुळे तालुक्यातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या या पर्यटनस्थळांबाबत पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे हे चित्र बदलून तालुक्यातील पर्यटनवाढीसाठी विकासासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होऊन पर्यटनस्थळावर अपुऱ्या पर्यटन सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. पर्यटनस्थळांचा विकास : सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचेदोडामार्ग तालुक्यातील नावारूपास आलेल्या या दोन्ही पर्यटनस्थळांबरोबरच दोडामार्गचे श्रद्धास्थान असलेला कसईनाथ डोंगर, तेरवण-मेढे येथील नागनाथ तीर्थक्षेत्र, शिरवल धरण, तळकटची वनबाग, सासोली येथील निसर्गनिर्मित धबधबा, अलीकडेच सासोली सड्यावर आढळलेली भूरूपे-विवरे, उसप येथील पॅराग्लायडिंगसाठी उपयोग होणारा बोकारावाडी डोंगर, मांगेली याबरोबरच फुकेरी हनुमंत गड, सिंधुदुर्ग-कोल्हापूर सीमेवर वसलेला पारगड किल्ला, आदी पर्यटनस्थळांचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणेही गरजेचे आहे.लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यकविशेषत: तालुक्यातील लोकप्रतिनिधी व राजकीय मंडळी यांनी तालुक्याच्या पर्यटन विकासाकडे शासनाचे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. केवळ विकासकामांच्या गप्पा मारणारे आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालणे गरजेचे