शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

टॅब नको; आधी मुख्य गरजा पूर्ण करा

By admin | Updated: May 14, 2017 22:56 IST

अंगणवाड्यांच्या निर्णयाला समितीकडून विरोध : पहिल्याच महिला व बालकल्याण सभेत विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कओरोस : अंगणवाडीमधील लहान मुले घरात मोबाईलवर खेळत असतात. त्यामुळे त्यांना अंगणवाडीतही टॅब दिल्यास ते पूर्णवेळ मोबाईलमध्येच व्यस्त राहतील. यामुळे त्यांच्या शिक्षणाकडे व खेळांकडे दुर्लक्ष होणार असल्याने महिला व बालकल्याण विभाग प्रशासनाने स्वउत्पन्न निधीतून २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील मोठी पटसंख्या असणाऱ्या अंगणवाड्यांना टॅब देण्याच्या घेतलेल्या निर्णयाला समिती सदस्यांनी तीव्र विरोध केला. तसेच अंगणवाडीमध्ये काय कमी आहे याचा सर्व्हे करून गरजेनुसार वस्तूंचे वाटप करावे, असे आदेश सभापती सायली सावंत यांनी सभेत दिले.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सहाव्या सभागृहाच्या महिला व बालकल्याण समितीची पहिली सभा सभापती सायली सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सभा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, सदस्या माधुरी बांदेकर, श्वेता कोरगावकर, संपदा देसाई, राजलक्ष्मी डिचवलकर, शर्वाणी गांवकर, पल्लवी राऊळ, पल्लवी झिमाळ, वर्षा कुडाळकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सदस्य व सभापती यांचे स्वागत करण्यात आले. महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त होणाऱ्या अनुदानातून सहा लाख रुपये अंगणवाड्यांना टॅब वितरित करण्यासाठी ठेवण्यात आले असून, त्याला समितीने मंजुरी द्यावी, असे सोमनाथ रसाळ यांनी सांगितले. मात्र सर्वच सदस्यांनी त्याला कडाडून विरोध केला. यानंतर प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांचा सर्व्हे करून त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिले. त्यानंतरच निर्णय घेण्याचे ठरविले. यावेळी जोशी व रसाळ या दोन्ही अधिकाऱ्यांनी या समितीचे अधिकार व प्राप्त निधीतून घ्यावयाच्या योजना याबाबत माहिती दिली. अनुदानविरहित पोषण आहार अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार शिजवून देणाऱ्या बचत गटांना मानधन देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून अनुदान प्राप्त नाही. तसेच सेविका व मदतनीस यांचे मार्च महिन्यापासूनचे मानधन अनुदानाअभावी थांबले होते, अशी माहिती प्रशासनाने दिली. यावेळी श्वेता कोरगावकर यांनी मुळात तुटपुंजे मानधन व तेही वेळेत मिळत नसेल तर त्या कर्मचाऱ्यांनी जगावे कसे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मानधन रक्कम शासन देत नसेल तर आम्ही काय करायचे? असे रसाळ यांनी सांगितले.३२० कुटुंबांचे संसार या विभागाने टिकविले जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील कौटुंबिक वादावर तोडगा काढण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या संचालिका दीपाली सावंत यांनी, आतापर्यंत आपल्या केंद्राजवळ ३६० कौटुंबिक वाद आले. त्यातील ४० वाद न्यायालयात गेले, तर ३२० वाद आपल्या केंद्रात झालेल्या मार्गदर्शनामुळे सुटले, असे सांगितले.‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश२०१६-१७ या आर्थिक वर्षात ९६ टक्के अंगणवाडी मुलांची तपासणी करण्यात आली आहे. उर्वरित चार टक्के तपासणी का करण्यात आली नाही? असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील २० व कणकवली तालुक्यातील पाच अंगणवाड्यांच्या तपासण्या करण्यात आल्या नसल्याचे पुढे आले. त्यावरती त्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुढील सभेत बोलावून घेण्याचे आदेश जोशी यांनी दिले. यावेळी रसाळ यांनी गेले सहा महिने जिल्ह्यातील २२२ अंगणवाड्या कुपोषणमुक्त ठेवण्यात यश आल्याचे सांगितले. आणखी ८० अंगणवाड्या होणार स्मार्टआपल्या विभागाने २०१६-१७ या वर्षात ५० जिल्हा परिषद मतदारसंघांतील प्रत्येकी एक याप्रमाणे ५० अंगणवाड्या स्मार्ट बनविण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये एलईडी, टीव्ही, मिनी पी.सी. व अन्य साहित्य पुरविण्यात येत आहे. आता राज्य शासनाने आदर्श अंगणवाडी ही संकल्पना सुरू केली आहे. यामधून एक लाख ६० हजार रुपये निधी दिला जाणार आहे. यात सौर संच, वजनकाटे, टीव्ही संच यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रकल्पातील किमान दहा अंगणवाड्या घेतल्या जाणार आहेत. आपल्या जिल्ह्यात दहा प्रकल्प असल्याने अजून दहा अंगणवाड्या स्मार्ट बनणार असल्याचे रसाळ यांनी यावेळी सांगितले.