शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निरवडेत आंबा, काजू बागा खाक

By admin | Updated: April 27, 2016 23:23 IST

सहा लाखांचे नुकसान : गावठी बॉम्ब फुटल्याने आग लागल्याचा ग्रामस्थांचा संशय; काढणीवेळी आंब्याचे नुकसान

तळवडे : निरवडे-कोनापाल (बाईतवाडी) येथे दोन एकर जागेतील आंंबा-काजू बागेस मंगळवारी आग लागून एकूण सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. सावंत कुटुंबीय, नामदेव पांढरे, अमरनाथ वैज यांच्या आंबा बागेस मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीच्या भडक्याने रमाकांत सावंत, पांढरे आणि वैज कुटुंबीयांची आंबा व काजूची कलमे जळून खाक झाली.निरवडे-कोनापाल (बाईतवाडी) येथे दोन एकर जागेतील आंंबा-काजू बागेस मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागून मोठी हानी झाली आहे. यामध्ये आंबा, काजू कलमे जळून खाक झाली. विशेष म्हणजे यामध्ये काढणीस आलेल्या आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. तयार आंब्यांच्या १५० पेट्यांचे नुकसान झाले असून, या नुकसानीचा विचार केल्यास ढोबळमानाने केवळ दोन लाखांचे नुकसान झाले, तर जळालेल्या आंबा कलमांचे चार लाख असे एकूण सहा लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी, निरवडे तलाठी अजित वैज, प्रमोद गावडे, तळवडे सरपंच व आंबा व्यापारी पंकज पेडणेकर, आंबा व्यापारी सदा सावंत, रमण सावंत व शेतकरी जमा झाले होते. अन्य सहकारी वर्गाने ही आग आटोक्यात आणली, अन्यथा मोठे नुकसान झाले असते. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने अन्य ठिकाणी त्याची झळ पोहोचली नाही. अन्यथा शेजारील बागेचे मोठे नुकसान झाले असते. दरम्यान, ही आग गावठी बॉम्ब फुटल्यामुळे लागल्याचा संशय उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. रानटी डुकरांना मारण्यासाठी गावठी बॉम्ब जंगलामध्ये ठेवले जातात. हे गावठी बॉम्ब जंगलात लावण्याचे प्रकार वाढले असून याचे लोन आता ग्रामीण भागातही पसरत आहे. त्याचाच हा परिणाम आहे. आंबा-काजू बागेत बॉम्ब ठेवण्याचा हा उद्देश जरी वन्य प्राण्यांना हुसकावण्याचा असला तरी शिकारीसाठीही याचा उपयोग होऊ शकतो. तसेच हा घडलेला आगीचा प्रकारही त्यामुळेच घडला असून वन विभागाने याची दखल न घेतल्याने असा प्रकार घडल्याचा आरोपही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, तळवडे गावचे सरपंच पंकज पेडणेकर यांची याठिकाणी आंबा बाग करारावर आहे. यात सावंत कुटुंबीयांची बाग त्यांनी करारावर घेतली. पण बहरात आलेल्या बागेलाच आग लागल्याने ते कमालीचे हताश झाले होते. त्यांनी या घटनेबद्दल संतापासह तीव्र नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)