शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत रंगणार नवा ‘खुर्ची’ वाद

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST

साडेतीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेत सेना - भाजपा युती सत्तेत आल्यानंतर सव्वा वर्षांच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे वाटप ठरले.

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेतील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. महेंद्र मयेकर यांचा सव्वा वर्षाचा कालावधी येत्या २४ जुलै रोजी संपत असल्याने ते राजीनामा देणार काय, याच प्रश्नाभोवती राजकारण फिरत असून, राज्यातील युती तुटलेली असताना रत्नागिरी पालिकेतील युती राहणार काय, याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे, तर नगराध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेतून आपसातील वाद विकोपास गेले आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपालिकेत सेना - भाजपा युती सत्तेत आल्यानंतर सव्वा वर्षांच्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे वाटप ठरले. प्रत्येक पक्षाला दोनदा संधी मिळणार असे ठरविण्यात आले. प्रथम संधी अधिक नगरसेवक असलेल्या शिवसेनेला मिलिंद कीर यांच्या रुपाने मिळाली. त्यानंतर सलग अडीच वर्षांचा काळ नगराध्यक्षपद भाजपकडे आहे. येत्या २४ जुलैनंतर तरी हे पद सव्वा वर्षाचा हक्क असलेल्या शिवसेनेला मिळणार की नाही, याचीच चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही स्थितीत सेनेकडे नगराध्यक्षपद राहू द्यायचे नाही, असे शिवसेनेच्या गोटातील वातावरण आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांकडूनही स्ट्रॅटेजी ठरवली जात आहे. सेनेतील इच्छुकांमध्येही या पदासाठी जोरदार स्पर्धा आहे. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष व इच्छुक हे एकदिलाने सर्व कामे करीत असताना एका उद्यानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरूनही वादंग झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नगराध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वादावर नेते कसा तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे. मात्र यानिमित्ताने वाद विकोपाला गेले आहेत. (प्रतिनिधी)कदमांच्या उद्याच्या दौऱ्याकडे लक्षशिवसेनेच्या नेत्यांनी नगराध्यक्षपदाबाबत मूळमूळीत भूमिका घेतल्याने भाजपने वरचढ होत सेनेला नगराध्यक्षपदापासून वंचित ठेवल्याची चर्चा शिवसेनेत आहे. येत्या रविवारी शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम हे रत्नागिरीत येत असून, रत्नागिरी नगराध्यक्षपदाचा विषय त्यांच्या कोर्टात नेला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.