शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कांजी, रूमडाची शीतपेये दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:19 IST

रासायनिक शीतपेयांचा वापर वाढला : आरोग्याला पोषक तरीही लोकप्रियतेची उणीव

सुरेश बागवे ल्ल कडावल बदलत्या जीवनशैलीत सर्वच बाबतीत पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्याच्या अट्टाहासापायी बेचव व आरोग्यास अपायकारक शीतपेये घशात ओतली जात आहेत. बाजारात अतिक्रमण केलेल्या या बेगडी पेयांच्या भाऊगर्दीत कांजी किंवा रूमडाच्या पाण्यासारखी शुद्ध, नैसर्गिक, मधूर व शीतल पेये मात्र नामशेष होत आहेत.उन्हाळ््यातील रखरखते ऊन व जीवघेण्या उकाड्यामुळे अंगाची लाही-लाही होत असताना रूचकर व शीतल असे रूंबड किंवा रूमडाचे पाणी होरपळलेल्या शरीराबरोबरच मनालाही थंडावा देत असे. रूमडाचे पाणी औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याचे मानले जात असल्याने पूर्वी या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. विशेषत: असह्य उकाड्याला उतारा म्हणून कडक उन्हाळ््यात या पाण्याचा वापर नैसर्गिक शीतपेय म्हणून अधिक प्रमाणात व्हायचा. मात्र, कालचक्राच्या प्रवाहाबरोबर आधुनिकतेच्या नावाखाली बाजारात घुसखोरी केलेल्या शेकडो बेचव, बेगडी शीतपेयांच्या मांदियाळीत मधुर, रूचकर व शीतल असलेले रूमडाचे पाणी आज लुप्त झाले आहे.रुमडाचे पाणी मिळवणे अतिशय कौशल्याचे व जोखमीचे काम असते. या पाण्याची चव चाखण्यासाठी सर्प हमखास येतो, असा समज ग्रामीण भागात असल्यामुळे रूमडाच्या झाडापासून पाणी मिळविताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. या कामाची व कामातील जोखमीची सर्व माहिती असलेली व्यक्तीच हे काम करू शकते. नवखी व्यक्ती रूमडाचे पाणी मिळविण्याच्या फंदात सहसा पडत नाही.पाणी मिळविण्यासाठी प्रथम एक रूमडाचे झाड हेरून त्याच्या आसपासची लहान-सहान झुडपे तोडून तो भाग साफ केला जातो. त्यानंतर या झाडाच्या ज्या पाळापासून पाणी मिळविणे सोयीस्कर असेल, त्या पाळाखाली सुमारे दीड फूट खोलीचा खड्डा खोदण्यात येतो. पाण्यासाठी ज्या आकाराचे भांडे वापरायचे असेल, त्या मापाचा अंदाज घेऊनच हा खड्डा खोदण्यात येतो. त्यानंतर रूमडाच्या पाळाला कोयत्याने तोडून मध्ये खाच केली जाते. एका कळशीचे तोंड फडक्याने बांधून ती पाळाच्या खाचाखाली खड्ड्यात ठेवण्यात येते. नंतर त्या पाळासहीत कळशीवर प्रथम पालापाचोळ्याचे आच्छादन करून ते दगड व मातीच्या साह्याने मजबूत केले जाते. सर्पाला आत प्रवेश मिळू नये, हा यामागे उद्देश असतो. दुसऱ्या दिवशी अतिशय सावधगिरी बाळगत प्रथम कळशीवरील आच्छादन दूर करून पाण्याने भरलेली कळशी खड्ड्यांमधून अलगदपणे बाहेर काढली जाते. कांजी, रूमड पेये नामशेष उष्म्याने अंगाची लाही-लाही होऊन घामाच्या धारा वाहू लागल्या की, पूर्वी रूमडाचे पाणी हमखास काढले जायचे. आता जमाना बदलला आहे. बदलत्या जीवनशैलीत आधुनिकतेच्या हव्यासापोटी सर्वच बाबतीत पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करण्याचा अट्टाहास वाढीस लागला आहे. या अट्टाहासापायीच परदेशी कंपन्यांची बेचव व आरोग्यास अपायकारक शीतपेये घशात ओतली जात आहेत. बाजारात अतिक्रमण केलेल्या या बेगडी पेयांच्या भाऊगर्दीत कांजी, किंवा रूमडाच्या पाण्यासारखी शुद्ध, मधुर व शीतलपेये मात्र नामशेष होत आहेत.