शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

भेकुर्लीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 11, 2014 00:02 IST

पालकमंत्र्यांनी दत्तक घेतलेले गाव : रस्त्यावरील दरड काढण्यात अपयश

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग --तळकट-भेकुर्ली रस्त्यावर ठिकठिकाणी दरड कोसळून मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे भेकुर्ली, खडपडे, कुंभवडे आदी ठिकाणच्या ग्रामस्थांना डोक्यावर सामान घेऊन पायी प्रवास करावा लागत आहे. गणेश चतुर्थीच्या कालावधीत तरी हा रस्ता वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. याबाबत बांधकाम विभागालाही कल्पना देण्यात आली. परंतु बांधकाम विभागाच्या निष्काळजी धोरण आणि जिल्हा परिषद सदस्यांचा बेजबाबदारपणा यामुळे रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ असून वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पालकमंत्री नारायण राणे यांनी दत्तक म्हणून घेतलेल्या या गावाकडे बांधकाम विभागाने मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता तातडीने वाहतुकीस मोकळा करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. तळकट-भेकुर्ली हा जिल्हा परिषद अंतर्गत कच्चा रस्ता असला, तरी परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांना वाहतुकीसाठी सोयिस्कर आहे. परंतु यावर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने रस्ता बंद होऊन लांब अंतराच्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. तसेच काही ठिकाणी रस्ता पूर्ण खचल्याने भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे आदी गावातील ग्रामस्थांना पायी प्रवास करावा लागत आहे. या घटनेला आता दीड महिना लोटला असून वृत्तपत्रांतूनही याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद सदस्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. गणेश चतुर्थी असल्याने रस्ता मोकळा केला जाईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. परंतु या सणालाही बांधकाम विभागाने महत्त्व दिले नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत डोक्यावर सामान घेऊन भर पावसात सुमारे १२ किलोमीटर अंतर ग्रामस्थांना पार करावे लागले. यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मार्गावर प्रवास करताना कधी कधी तर ओहोळाच्या पाण्याचे वाढलेले पाणी ओसरेपर्यंत ग्रामस्थांना वाट पहावी लागते. त्यामुळे तळकट-भेकुर्ली रस्ता तातडीने वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणी होत आहे. दयनीय अवस्थापालकमंत्री नारायण राणे यांनी भेकुर्ली गाव दत्तक घेतले आहे. मात्र, या गावची अवस्था अजूनही दयनीय आहे. दळणवळणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने हे गाव अद्याप मागासलेले राहिले आहे. त्यामुळे तळकट ते भेकु र्ली या रस्त्यावरील मोऱ्या नव्याने बांधण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून मोऱ्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत एकही मोरी बांधण्यात आली नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे.