शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

नवनगर प्राधिकरणमधून ७० हेक्टर क्षेत्र वगळले

By admin | Updated: July 2, 2015 00:22 IST

शासनाचा निर्णय : सिंधुदुर्गनगरीच्या विकासाचा मार्ग खुला; नगरविकास विभागाची अधिसूचना जारी

ओरोस : सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणाच्या नियंत्रणातील ओरोस येथील परंपरागत निवास व शेती झोनमधील ७० हेक्टर क्षेत्र वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. तशी नगरविकास विभागाची अधिसूचनाही जारी झाल्याने या झोनमधील महामार्गाच्या पूर्वेकडील सुलोचनानगर ते पीठढवळ नदीपर्यंतचा ७० हेक्टरचा हा पट्टा झोनमधून मुक्त झाला.यापूर्वी एकदा ओरोस ग्रामपंचायतीने प्राधिकरण क्षेत्रातून जनतेची घरे, वाणिज्य आणि सार्वजनिक विकासासाठी असलेली ही जमीन वगळण्यात यावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार ओरोस येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ च्या पूर्वेकडील सर्व ७० हेक्टर क्षेत्र वगळण्याचा ठराव प्राधिकरण समितीने केला होता आणि ११ मार्च २०१० ला नगरविकास खात्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर द्वारकानाथ डिचोलकर यांनी हे क्षेत्र वगळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता शासनाने अधिसूचना काढत हे क्षेत्र वगळण्याचा निर्णय घेतल्याने ओरोसवासीयांच्या संघर्षाला यश आले.नगरविकास विभागाच्या २७ एप्रिल २०१५ च्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र वगळले आहे. वगळलेल्या क्षेत्राकरिता यापुढे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सुधारित केलेल्या मंजूर विकास आराखड्यातील नियमांनुसार बांधकाम परवानगी राहील व ही परवानगी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी घेणे आवश्यक राहील, असेही या अधिसूचनेत नमूद केले आहे.ओरोस येथील महामार्गाच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील एकूण ११५ हेक्टर क्षेत्र प्रथम मुख्यालय विकासासाठी सिडकोकडे व त्यानंतर सिंधुदुर्गनगरी नवनगर विकासासाठी प्राधिकरण समितीकडे अधिसूचित करून शासनाने दिले होते. गेली २० वर्षे या दोन वेगळ्या अधिसूचनांमुळे या झोनमधील विकासासाठी कोणतीही परवानगी प्रशासन देत नव्हते. आता हे क्षेत्र प्राधिकरण समितीच्या कार्यक्षेत्रातून वगळण्यात आल्यामुळे या ७० हेक्टर क्षेत्रातील विकासाचा मार्ग आता खुला झाला. (वार्ताहर)ख्रिश्चनवाडीसाठी लढा सुरूयाच झोनमधील ख्रिश्चनवाडीमधील रहिवासी क्षेत्र शहर विकासासाठी आवश्यक नाही. हे क्षेत्र वगळण्यात यावे, यासाठी आपला न्यायालयीन लढा सुरू राहणार असल्याचेही याचिकाकर्ते द्वारकानाथ डिचोलकर यांनी पत्रकारांना सांगितले. आपण याचिका दाखल केल्यामुळेच शासनाला हे क्षेत्र वगळावे लागले, असेही ते म्हणाले.