शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बांदरी विभागाला नवसंजीवनी?

By admin | Updated: January 13, 2016 21:59 IST

मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : महाळुंगे येथे जलोपासना अभियान

खेड : अठरा गाव बांदरी विभागातील महाळुंगे गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ जानेवारीला भेट देणार आहेत. येथील जगबुडी नदीच्या पाण्यावर जलोपासना अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खेड येथील एमबीए महाविद्यालयाचे प्राध्यापक सतीश कदम यांच्या स्वत:च्या मालकीच्या ६ एकर जागेत उभारण्यात आलेल्या फार्म हाऊसमध्ये ग्रामीण पर्यटन सुरू करण्याच्या कामालाही त्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील डोंगराळ भाग असलेल्या महाळुंगेसारख्या गावात बहुउद्देशीय योजनांचा प्रथमच प्रारंभ मुख्यमंत्री यांच्याहस्ते होत आहे. हा मार्ग असलेल्या अठरा गाव धवडे बांदरी विभागातील ४० गावांतील पर्यटन आणि कृषी विकासाला यामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा त्यामुळे महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस १७ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता महाळुंगे येथे उपस्थित राहणार आहेत. गावातील केदारनाथ मंदिराजवळ यावेळी खास जलचेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जगबुडी नदीच्या पाण्यावर जलोपासना अभियानासह आंबवली महाळुंगे ग्रामीण पर्यटन कार्याला त्यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने या कोकण जलपरिक्रमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिली. जलपरिक्रमा आणि जलचेतना परिषदेमुळे येथील अठरा गाव बांदरी विभागासह तालुक्यातील कृषी आणि पर्यटन क्षेत्रही विकसित होणार आहे. या भागातील डोंगराळ भागात असलेल्या धनगरवाड्यांसह डोंगरातील अनेक गावांना वारंवार भासणारी पाणीटंचाई तसेच नदीकिनारी पारंपरिक पध्दतीने करीत असलेल्या शेतीमध्ये बदल करण्याच्या उद्देशाने या जलचेतना परिषदेचा आणि जलपरिक्रमा योजनेचा चांगला लाभ मिळणार आहे. तसेच त्यामुळे रोजगारासह सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला हातभार लागणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री अनंत गीते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, भटक्या विमुक्त जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते आणि प्रमुख मार्गदर्शक राजेंद्रसिंह आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. (प्रतिनिधी) पर्यटनाची माहिती : १९९५ नंतर मुख्यमंत्री ग्रामीण भागात १९९५मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी तालुक्यातील महत्त्वाच्या कामांसाठी भेटी दिल्या होत्या़ त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १९९५नंतर तालुक्यातील ग्रामीण भागाला भेट देणारे पहिले मुख्यमंत्री आहेत. ग्रामीण भागाच्या पर्यटन विभागाची माहिती यानिमित्त घराघरात पोहोचणार आहे़