शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवरात्रोत्सवाचे वेध - कणकवलीत तयारी

By admin | Updated: September 23, 2014 23:53 IST

जिल्ह्यात उद्यापासून ११३ ठिकाणी दुर्गामातेची स्थापना

सावंतवाडी : गणपती बाप्पाच्या निरोपानंतर वेध लागतात नवरात्रोत्सवाचे. आपल्या शक्तीने उन्मत्त होऊन देवादिकांनाही त्रास देणाऱ्या महिषासूर नामक दैत्याशी देवीने नऊ दिवस, नऊ रात्री युध्द करून त्याचा वध केला. म्हणून तिला ‘महिषासूरमर्दिनी’ म्हटले जाते. नवव्या दिवशी दैत्याचा वध झाल्यानंतर विजयोत्सवाचा दिवस म्हणजे दसरा. अशी नवरात्रोत्सवाची प्राचीन संकल्पना सांगितली जाते. आदिमायेच्या उपासनेचा हा उत्सव संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. महामाया, आदिशक्ती, महाकाली आणि महाशक्ती अशा विविध उपाधी असलेल्या देवीचा उत्सव मोठ्या मंगलमय वातावरणात साजरा होतो. गेल्या काही वर्षात शहरीभागापुरता मर्यादित असलेला नवरात्रोत्सव आता ग्रामीण भागातही पोहोचला आहे. नवरात्रोत्सव म्हणजे गरबा आणि दांडिया नृत्य ओघाने आलेच. एरव्ही पाश्चिमात्य कर्णकर्कश संगीतावर ताल धरणारी तरुणाई नवरात्रीच्या काळात मात्र पारंपरिक वेशात थिरकते. नवरात्रोत्सवानिमित्त इतर विविध कार्यक्रमांबरोबरच दांडिया स्पर्धांचे आयोजन होत असल्यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांनाही व्यासपीठ मिळू लागले आहे. नवरात्रोत्सव मंडळांतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये भजने, फुगड्या यासह दांडिया स्पर्धाही आयोजित केल्या जातात. तर दसऱ्या दिवशी देवीचे विधीवत पूजन करून मिरवणुकीसह विसर्जन केले जाते.नवरात्रोत्सव म्हणजे केवळ गरबा, दांडिया हे तयार झालेले समीकरणही बदलणे आवश्यक आहे. आदिशक्तीच्या पूजनाबरोबरच समाजातील स्त्रीलाही सन्मानाची वागणूक देण्यासाठी समाजजागृती होणे अत्यावश्यक आहे. (वार्ताहर)नवरात्रोत्सवाला अवघा एक दिवस उरला असताना या उत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहराबरोबरच जिल्ह्यात ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात येत आहे. श्री दुर्गादेवीच्या प्रतिष्ठापनेसाठी मंडप उभारण्याचे काम जोरदार सुरू आहे. तर दुर्गादेवीच्या मूर्तीची रंगरंगोटी सुरू असून मूर्तिकार या कामात दंग झाले आहेत.घटस्थापनेने २५ सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या उत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी तर काही ठिकाणी गुरूवारी श्री दुर्गादेवीची मूर्ती ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने आणण्यात येणार आहे. त्यादृष्टीने अनेक मंडळांकडून तयारी सुरू आहे. श्री दुर्गादेवीसाठी भव्य मंडप उभारण्यात येत आहे. या उत्सवात दांडियाबरोबरच गरब्याची धूम सर्वत्र पहायला मिळणार आहे.कणकवली शहरात राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येथील बसस्थानकासमोरील कार्यालयाजवळ, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर, बसस्थानकासमोरील परिसरात गोंधळी बांधवांच्यावतीने तर बाजारपेठ मित्रमंडळाच्यावतीने कांबळीगल्ली येथे श्री दुर्गादेवीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येते. तर कलमठ येथे पोलीस स्थानकासमोर तसेच वृंदावन हॉलमध्ये गुजराती बांधवांच्यावतीनेही नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. विद्युत रोषणाईही करण्यात आली असून त्यामुळे कणकवली शहराला एक प्रकारे उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.नवरात्रोत्सवात प्रत्येक प्रभागाबरोबरच गल्लीगल्लीत रात्रीच्यावेळी गरबानृत्य रंगलेले पहायला मिळते. त्यादृष्टीने सध्या तयारी सुरु आहे. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्राचीन-ऐतिहासिक देवस्थानांची लगबगसावंतवाडीतील माजगाव येथील श्री देवी सातेरी मंदिराच्या नवरात्रोत्सवाला सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. गावातील तेरा वाड्यांमधील ग्रामस्थ उत्सवाच्या पूर्वतयारीत गुंतले आहेत. वेंगुर्ले येथील श्री देवी सातेरी मंदिरात नऊ दिवस नऊ रुपात देवीची पूजा बांधली जाते. तर कुडाळ येथील केळबाई नवरात्रोत्सव माहेरवाशिणींना जिव्हाळ्याचा ठरतो. यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणीही नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होतो. शासकीय यंत्रणांची सिद्घतानवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या उत्सवाच्या ठिकाणी दोन होमगार्ड आणि एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आल्याने शहरातील नाक्यानाक्यावर सजग पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे. सावंतवाडी शहरात प्रथमच बाजारपेठ मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे हे २४ वे वर्ष असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठ मित्रमंडळाचा नवरात्रोत्सव म्हणजे शहरवासीयांसाठी खास आकर्षण ठरतो. तसेच माठेवाडा मित्रमंडळ, आेंकार कला क्रीडा मंडळ, भटवाडी, जिमखाना मित्रमंडळ यांच्यावतीने दरवर्षी दुर्गापूजन करण्यात येते. सावंतवाडी परिसरात भराडी दांडिया ग्रुप, कोनापाल, यंग स्टार दांडिया ग्रुप, तळवडे, जय भवानी ग्रुप, वेंगुर्ले, आेंकार कला क्रीडा मंडळ दांडिया ग्रुप, भटवाडी, नवदुर्गा दांडिया ग्रुप, सावंतवाडी, निरुखेवाडी दांडिया ग्रुप कोलगाव, होली फेथ दांडिया ग्रुप, निरवडे, जय गणेश दांडिया ग्रुप, मळगाव, दत्त प्रासादिक दांडिया ग्रुप, मळगाव, वडखोल दांडिया ग्रुप, वडखोल या महत्त्वाच्या दांडियाचा समावेश होतो.