शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन हवे

By admin | Updated: February 12, 2016 23:43 IST

दीपक केसरकर : कोकण कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रविषयक परिसंवाद

दापोली : भारत कृषिप्रधान देश असून, बहुतांश जनता शेतीवर अवलंबून असली तरी देशाच्या अर्थकारणामध्ये शेतीचे योगदान अतिशय कमी आहे, ही वस्तुस्थिती नाकारुन चालणार नाही, देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर त्यासाठी शेतीचा विकास होणे अत्यावश्यक आहे. हा विकास साधण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि नियोजन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आज शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात नाही. ही मानसिकता बदलून प्रगत शेतीशिवाय तरणोपाय नाही. ही भावना प्रत्येकाने आपल्या अंगी बाणवली पाहिजे, असे प्रतिपादन वित्त आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रविषयक परिसंवादाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, अन्य राज्यांमध्ये काही पिकांची उत्पादकता आपल्या राज्यापेक्षा जास्त दिसून येते. याची कारणमिमांसा अभ्यासून तशा पद्धतींचा राज्यामध्ये अवलंब होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. याद्वारे पिकाची उत्पादकता वाढून शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी व्यासपीठावर भारत सरकारच्या भटक्या व विमुक्त जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश महिंद्रे, संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. रमेश बुरटे आणि कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जीवन तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. तपस भट्टाचार्य म्हणाले, शेतीतील उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये खूप तफावत आहे. यासाठी विपणनानंतर उत्पादक शेतकऱ्याला मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण वाढवले गेले पाहिजे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून ही गोष्ट साध्य करणे शक्य आहे. याचबरोबर विविध पिकांची उत्पादकता वाढवण्यावर भर देणेही अत्यावश्यक आहे. शेती करताना निव्वळ एकाच पिकावर अवलंबून न राहता त्याच्या जोडीला आंतरपिके आणि विविध पूरक व्यवसाय यांचा अवलंब केल्यास शेतीचा आणि पर्यायाने देशाचा आर्थिक विकास होण्यास निश्चित हातभार लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.परिषदेच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिका आणि सिडीजचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी विद्यार्थ्यांच्या योगदानातून प्राप्त झालेल्या रकमेचा धनादेशही केसरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे संयोजक सचिव डॉ. सुधीर वाडकर यांनी केले. डॉ. नितीन गोखले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जीवन तलाठी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)दादा इदाते : थेंब न थेंब साठविणे गरजेचेकोकणातील पाण्याचा थेंब न थेंब कसा साठविता येईल आणि प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पिके कशी घेता येतील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रमुख अतिथी दादा इदाते यांनी यावेळी सांगितले.३१० शास्त्रज्ञया परिषदेमध्येएकूण २९९ संशोधनपर लेख सादर करण्यात येणार असून, या परिषदेमध्ये देश-विदेशातील ३१० शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला आहे.