शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

श्रमदानातून नैसर्गिक झऱ्यांची दुरुस्ती

By admin | Updated: December 9, 2014 23:18 IST

ओटवणे ग्रामस्थांचा उपक्रम : भटवाडी-शेरवाळेवाडी दरम्यानचा रस्ता

ओटवणे : येथील भटवाडी ते शेरवाळेवाडी या दरम्यान तब्बल दीड किलोमीटर वाहत जाणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक झऱ्याची स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदानातून दुरुस्ती केली. या झऱ्याचे पाणी प्रवाहीत होण्यासाठी मातीचे पाट तयार करून त्यांची डागडुजी करण्याचे काम ग्रामस्थांमार्फत दरवर्षी श्रमदानातून केले जाते. ओटवणे-भटवाडी येथे जवळ-जवळ पाच अश्वशक्तीहून अधिक क्षमता असलेला पाण्याचा प्रवाह झऱ्यामार्फत निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी हा प्रवाह मातीच्या पाटामार्फत आपल्या शेतीकडे वळविला आहे. यासाठी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत लांबीचे पाट ग्रामस्थांनी तयार केले आहेत. परंतु हे पाट पावसाळ्यात कोसळत असल्याने दरवर्षी पावसाळ्यानंतर त्यांची दुरुस्ती करावी लागते. तसेच पाटातून पुढे वाहत जाणाऱ्या पाण्याच्या साठवणुकीसाठी शेततळी नसल्याने लाखो लिटर पाणी वाया जाते. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केला जातो. गेल्या पाच वर्षांपासून या झऱ्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पक्क्या सिमेंटचे बंधारे, पाणी साठवणुकीच्या शेततळी यासाठी निधी मंजूर व्हावा, यासाठी शासनाकडे निवेदने, प्रस्तावही सादर करण्यात आले. मात्र, शासनाकडून त्यासंबंधी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. स्थानिक ग्रामपंचायतही उदासीन आहे. या पाण्याचा वापर करून गावठणवाडी, भटवाडी, शेरवाळेवाडी येथील १५० कुटुंबे उन्हाळी शेती करतात. या पाण्यामुळे सुमारे पाच एकरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली आणले जाते. दीड किलोमीटर लांब असलेल्या या झऱ्याच्या पाटाची स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदानातून दुरुस्ती केली. यावेळी सुनील गावकर, नारायण गावकर, न्हानू गावकर, प्रकाश गावकर, बाबाजी गावकर, अनंत धुरी, अर्जुन भिसे, दशरथ गावकर, प्रकाश गावकर, मिलिंद भिसे, विजय गावकर, गोविंद भिसे, राजू मेस्त्री, मुकुंद गावकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शासनाकडे वेळ नाही की पैसाएका बाजूला एकात्मिक पाणलोट विकास तसेच ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेखाली शासनाकडून पाणी साठवणुकीसाठी गवगवा केला जातो, कोट्यवधी रुपये खर्ची घातले जातात, परंतु या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असूनही त्याचे नियोजन करण्यासाठी शासनाकडे वेळ नाही की पैसा, असा सवाल ग्रामस्थांमधून होत आहे.