शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नाथ पै पिढी घडविणारी संस्था

By admin | Updated: February 8, 2015 01:00 IST

विनायक राऊत : वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

कुडाळ : बॅ. नाथ पै हे सर्वगुणसंपन्न असे कोकणातीलच नव्हे, तर देशातील व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने चालणारी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था अष्टपैलू असून, वैचारिक श्रीमंती असलेल्या या शिक्षण संस्थेतून बहुगुणी व सद्गुणी विद्यार्थ्यांची देशाला घडविणारी पिढी बाहेर पडेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक उद्घाटनप्रसंगी केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, अध्यापक विद्यालय व कला, वाणिज्य, विज्ञान महिला महाविद्यालय यांचा संयुक्तिक वार्षिक स्रेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन शुक्रवारी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, प्राध्यापक अल्ताफ खान, बांदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत, प्राचार्या डॉ. दीपाली काजरेकर, प्राचार्य सरोज दाभोलकर तसेच इतर प्राध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळी बॅ. नाथ पै संस्था संचलित अध्यापक, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विविध कला, क्रीडा, निबंध व वक्तृत्व तसेच इतर स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना खासदार राऊत तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. एकीकडे सामाजिक भान विसरत असताना सामाजिक बांधीलकी जपणारे खासदार राऊतांसारखे नेतृत्व मिळाले असल्याचे संंस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले. यावेळी प्रा. अल्ताफ खान म्हणाले, शिक्षण हे आपल्यापेक्षा चार पावले पुढे असते. त्यामुळे स्वत: बदलून शिक्षकांनी मुलांना हाताळण्याचे तंत्र अवगत करणे आवश्यक आहे. हे जग टेक्नॉलॉजीचे असून, ज्ञान मिळवीत रहा. पालक व मुले यातील दरी वाढू न देता पालकांनी मुलांशी संवाद साधावा. शाळेत शिक्षकांनी मुलांशी पालकांप्रमाणे, तर पालकांनी शिक्षकांप्रमाणे वागावे, तरच आजच्या पिढीशी आपण अधिक व्यापक प्रमाणात संवाद साधू शकू, असेही ते म्हणाले. स्वत:ला दररोज अपडेट करण्यासाठी दैनंदिन अलर्ट रहा. सरावाने हे ते तुमच्या अंगवळणी पडेल, असे प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)