शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेत्यांवर गुंडाना घेऊन फिरण्याची वेळ : नारायण राणे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:57 IST

आमच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सभांना गुंडांची उपस्थिती होती.शिवसेनेला माणसेच मिळत नसल्याने गुंड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.आम्ही मात्र विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली.त्यामुळे जनता आमच्या पूर्ण पाठीशी राहिल.नीलेश राणे ६० हजाराच्या मताधिक्याने निवडणून येतील असा विश्‍वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देशिवसेना नेत्यांवर गुंडाना घेऊन फिरण्याची वेळ : नारायण राणे यांची टीकाआम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली

कणकवली :आमच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सभांना गुंडांची उपस्थिती होती.शिवसेनेला माणसेच मिळत नसल्याने गुंड घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.आम्ही मात्र विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली.त्यामुळे जनता आमच्या पूर्ण पाठीशी राहिल.नीलेश राणे ६० हजाराच्या मताधिक्याने निवडणून येतील असा विश्‍वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथे व्यक्त केला.नारायण राणे यानी कणकवली तालुक्यातील वरवडे फणसनगर येथे मंगळवारी ११.३० वाजण्याच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी त्यांच्या समवेत पत्नी निलम राणे, सून प्रियांका राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.मतदानाचा हक्क बजावण्यापुर्वी नारायण राणे यानी वरवडे येथील आपल्या निवासस्थानी भेट देऊन देवदर्शन घेतले त्यानंतर फणसनगर जिल्हापरिषद शाळेतील मतदान केंद्रावर दाखल होत मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.नारायण राणे म्हणाले, गेली ३० वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.जिल्ह्याचा विकास करत असताना जात,पात,धर्म न मानता जिल्हा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवुन काम केले.त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मतदार निश्‍चितपणे निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.दहशतवादाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, दहशतवाद जिल्ह्यात कोण करतो हे कालच्या प्रसंगावरुन सिध्द झाले आहे.पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या समवेत सभेत निलेश पराडकर नामक गुंड बसतो. त्यावरुन शिवसेना हीच दहशत पसरवित असल्याचे सिध्द होत आहे.

जिल्ह्याच्या विकासाची कोणती कामे करायची नाहीत आणि समोरच्यांना बदनाम करायचे हेच शिवसेनेचे सुत्र असुन शिवसेनेत नितिमत्ता आणि धोरण शिल्लक राहीलेले नाही.उध्दव ठाकरे यांना विकासाबाबत काही देणे-घेणे राहीलेले नाही. केवळ मतांसाठी नागरिकांचा वापर करायचा हेच त्यांचे सुत्र असुन सिंधुदुर्गात दहशतवाद पसरविण्यास शिवसेनाच कारणीभुत असल्याचा आरोप खासदार नारायण राणे यानी यावेळी केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarayan Raneनारायण राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग