शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंची दहशतवादी प्रवृत्ती

By admin | Updated: July 16, 2014 23:16 IST

दीपक केसरकर यांचा आरोप : वैभववाडीत शिवसेनेकडून स्वागत

वैभववाडी : लोकशाही पद्धतीने विकासाची स्पर्धा जमत नसल्याने दहशतीच्या मार्गाने दुसऱ्याला संपविण्याची स्पर्धा नारायण राणे करीत आहेत. नारायण राणे ही प्रवृत्ती आहे. ती नष्ट करून जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करताना तिचा बिमोड केला जाईल, असे मत आमदार दीपक केसरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेना प्रवेशाची घोषणा केल्यानंतर पहिल्या जिल्हा दौऱ्याची सुरूवात केसरकर यांनी वैभववाडीतून केली. येथील संभाजी चौकात आमदार केसरकर यांचे शिवसैनिकांनी जल्लोषी स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, राजू शेटये, नगरसेवक सुशांत नाईक, भूषण परूळेकर, युवा सेनेचे हर्षद गावडे, तालुकाप्रमुख अशोक रावराणे, संघटक नंदू शिंदे, शंकर नारकर, जनार्दन विचारे, अमित लोखंडे, विलास साळसकर आदी उपस्थित होते.दौऱ्याची सुरूवात करण्यापूर्वी आमदार केसरकर यांची विश्रामगृहावर पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, मी सत्तेच्या मागे धावणारा कार्यकर्ता नाही. त्यामुळे कोणत्याच पदाची अपेक्षा ठेवून आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. तर राणे प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी शिवसेनेचे चांगले पाठबळ मिळत असल्याने मी सेनावासी होत आहे. त्यामुळे जनतेच्या प्रेमाची कदर ठेवून पक्षाची शिस्त पाळण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करणार आहोत, असे म्हणाले.केसरकर म्हणाले, माझ्या प्रवेशामुळे शिवसेनेत नवा- जुना असा कोणताच वाद होणार नाही. तशी काळजी आपण आधीच घेतली आहे. शिवसेनेत माझे कोणीही समर्थक नसतील. जे असतील ते फक्त शिवसैनिकच असतील. शिवसेना आणि भाजपा ही तत्व आणि भावनेवर आधारलेली जुनी युती आहे. त्यामुळे माझ्या शिवसेना प्रवेशाने युतीत कटुता येणार नाही. ‘आपण करू तोच विकास’ हे लोकशाहीविरोधी राणेंचे धोरण जिल्ह्याच्या प्रगतीला मारक आहे. म्हणूनच जिल्ह्यात कोणीही उद्योजक गुंतवणूक करायला पुढे येत नाही. पुढील काळात हे चित्र पालटण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सावंतवाडी मतदारसंघावर भाजपाने केलेल्या दाव्याबाबत विचारले असता केसरकर म्हणाले, जागा वाटपाचा निर्णय उद्धव ठाकरे आणि भाजपाचे वरिष्ठ नेते घेतील. युतीच्या नेत्यांनी सांगितले तर सावंतवाडीतून मी लढेन. नसेल तर युती देईल त्या उमेदवाराला निवडून आणेन. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील तीनही आमदार युतीचेच असतील, असा विश्वास व्यक्त करीत सावंतवाडीबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आपली चर्चा झालेली असून तेच वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतील. मी त्यावर कोणतेही भाष्य करणार नाही.