शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राजन तेलींचा भाजप प्रवेश ही नारायण राणे यांचीच खेळी : सिद्धेश परब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 16:11 IST

राजन तेलींचा भाजप प्रवेश ही नारायण राणे यांचीच खेळी असून कार्यकर्ते आपल्याला सोडून जाऊ नयेत यासाठी राणे यांनीच तेली यांना भाजपमध्ये पाठविले.

ठळक मुद्देराजन तेलींचा भाजप प्रवेश ही नारायण राणे यांचीच खेळी : सिद्धेश परब  तेलींचे काम करण्याची सूचना

वेंगुर्ला : राजन तेलींचा भाजप प्रवेश ही नारायण राणे यांचीच खेळी असून कार्यकर्ते आपल्याला सोडून जाऊ नयेत यासाठी राणे यांनीच तेली यांना भाजपमध्ये पाठविले. त्यानंतर आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचे जाहीर करून सर्व कार्यकर्त्यांना राजन तेली यांचे काम करण्याची सूचना ते करीत आहेत. येत्या निवडणुकीत तेली यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केल्यास जनता मतपेटीतून चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सिद्धेश परब यांनी दिला आहे.विधानसभा निवडणुकीअगोदर भाजप पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून पक्षप्रवेशाची जणू चटक लागल्यासारखी परिस्थिती सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे. राणे यांनीही काही दिवसातच भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्ताबाबत सर्वच क्षेत्रात उलटसुलट चर्चा होत असताना जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धेश परब यांनी या वृत्ताला जोडून हा घणाघात केला आहे.२०१४ मध्ये आरोंदा जेटी मुद्यावर राजन तेलींबाबत तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो असे करून कार्यकर्त्यांना थोपविण्यासाठी राणे खेळी खेळत होते. हे आता जनता समजून चुकली आहे. सिंधुदुर्गातील जनता राणेंच्या तालमीत वाढलेल्या तेलींच्या भूलथापांना कधीच बळी पडणार नाही.

आरोंदा जेटीप्रश्नी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेवेळी तेली कसे बदलले, हे येथील जनतेला पूर्णपणे समजले आहे. त्यामुळे फसवाफसवीचे राजकारण फार काळ चालत नाही व बाहेरच्या उमेदवाराला येथील मतदार स्वीकारत नाहीत हे पुन्हा एकदा ही जनता निवडणुकीत दाखवून देईल, असे परब यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेRajan Teliराजन तेली sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण