शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कोकिसरेत चोरट्याचा दीड लाखावर डल्ला

By admin | Updated: January 27, 2017 23:24 IST

सव्वा चार तोळ््याचे दागिने लंपास : श्वानपथक घटनास्थळावर घुटमळले; दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश

वैभववाडी : कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयानजीक शिवसेनेचे श्रीराम शिंगरे राहत असलेल्या घरात चोरट्याने डल्ला मारला. चोरट्याने ३ दरवाज्यांची कुलपे तोडून शिंगरे यांच्या कपाटातील सव्वाचार तोळ्याचे सोन्याचे दागिने व १६ हजारांची रोकड असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी रात्री घडली. पोलिसांचे श्वान घटनास्थळाहून मुरकर इमारत व तेथून महालक्ष्मी पेट्रोल पंपावर जाऊन घुटमळले.अधिक वृत्त असे की, माधवराव पवार विद्यालयाचे गुरुवारी स्नेहसंमेलन होते. त्यामुळे शिंगरे कुटुंबिय स्नेहसंमेलनाला गेले होते. ही संधी साधून चोरट्याने शिंगरे भाड्याने राहत असलेल्या घरात डल्ला मारला. मध्यरात्री शिंगरे कुटुंबिय स्नेहसंमेलनाहून घरी आल्यावर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. अंगणातील लाईट चालूच होता. तरीही पुढील दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर शिंगरेंच्या खोलीचे कुलूप तोडून पर्समधील किल्लीने लोखंडी कपाट उघडले.कपाटाच्या तिजोरीत तीन तोळ्याचे मंगळसूत्र, चार ग्रॅमच्या कानातील दोन रिंग, दोन ग्रॅमच्या दोन रिंग असे चार तोळे दोन ग्रॅम वजनाचे सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व सिलिंडर विक्रीची १६ हजार रुपये रोकड चोरट्याने लंपास केली. त्यानंतर त्याने शिंगरे यांच्या घरमालकाच्या दरवाज्याचे कुलूप तोडून कपाटातील किल्लीने तिजोरी उघडली. मात्र, चोरुन नेण्यासारखे तेथे काहीच नव्हते. त्यामुळे घराचा मागील दरवाजाने चोरटा निघून गेला. श्रीराम शिंगरे यांनी पहाटे या घटनेची पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस मुख्यालयातून श्वान पथकास पाचारण केले. सकाळी साडेअकराच्या सुमारास श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील वस्तूंचा वास दिल्यावर श्वान मागील दरवाजाने बाहेर पडले. तेथून विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊन वैभववाडी-तळेरे रस्त्यावरुन मुरकर इमारतीत गेले. तेथून ते महालक्ष्मी पेट्रोल पंपावर जाऊन घुटमळले. त्यामुळे पोलिसांच्या हाती ठोस असे काहीच लागले नाही. गेल्या सव्वा महिन्यातील ही दुसरी मोठी घरफोडी असल्याने जनतेत भीतीचे वातावरण असून पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले आहे. (प्रतिनिधी)