शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाईक यांनी जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत

By admin | Updated: November 27, 2014 00:26 IST

सी वर्ल्ड प्रकल्पावरून नीतेश राणे यांचा टोला

कणकवली : सी वर्ल्ड प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. मात्र, मालवण येथील जनतेचा विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर हलविण्याचा निर्णय घेतला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचेच फार मोठे नुकसान होणार आहे. यासाठीच मालवणच्या जनतेला हा प्रकल्प नको असेल तर देवगड तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊन हा प्रकल्प तेथे नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी भूमिका मी मांडली आहे. त्यामुळे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पूर्ण माहिती न घेता जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत, असा टोला काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यानी लगावला आहे.सी वर्ल्ड प्रकल्पाबाबतच्या आमदार नीतेश राणे यांच्या वक्तव्यावरून आमदार वैभव नाईक यांनी टीका केली होती. याला प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदार राणे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षाचा आमदार म्हणून नीतेश राणे सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत काहीही करु शकणार नाहीत. त्यांची दखल घेण्याची गरज नाही अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता हा शिवसेनेचा आहे. त्यामुळे वैभव नाईक हेही विरोधी पक्षाचेच आमदार आहेत. त्याची त्यांनी प्रथम जाणीव ठेवावी. कोणाच्याही ‘अरे’ ला मी ‘का रे’ करू इच्छित नाही. सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत राजकारणही करण्याची माझी इच्छा नाही. मात्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सी वर्ल्ड प्रकल्प मालवणमध्ये होणार असे जाहीर केले तेव्हापासून वायंगणी आणि तोंडवळी गावच्या ग्रामस्थांबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते व नेते प्रकल्पाला विरोध आहे असेच मानत आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली वक्तव्येही सी वर्ल्ड प्रकल्पाला विरोधच करणारी आहेत. त्यामुळे मालवणच्या जनतेला सी वर्ल्ड प्रकल्प नको असेल किंवा ग्रामपंचायतीच्या ठरावातून या प्रकल्पाला विरोध होत असेल तर हा प्रकल्प देवगड येथे नेण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आपण सांगितले आहे. जनतेचा विरोध लक्षात घेऊन शासनाने हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर नेल्यास जिल्ह्याचेच नुकसान होणार आहे. प्रकल्प जिल्ह्यात रहावा यासाठी देवगडच्या जनतेला विश्वासात घेऊन तेथे प्रकल्प नेण्याचा प्रयत्न स्वत: करेन अशी भूमिका मांडली आहे. वायंगणी, तोंडवळी ग्रामस्थांचा १२०० एकर जमीन प्रकल्पासाठी देण्याला विरोध आहे. पर्यटन मंत्रालय किंवा एमटीडीसीने आवश्यक तेवढीच जमीन घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. पण देवगड तालुक्यातील काही ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. (वार्ताहर)शिवसेनेकडून मतांसाठी जनतेला खोटी आश्वासनेदेवगड तालुक्यातील किनारपट्टीच्या भागात एक टक्काही मासेमारी होत नाही अशी अनेक ठिकाणे आहेत. तसेच १२०० एकर जमीन देण्याचीही अनेक लोकांची तयारी आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच सी वर्ल्डबाबत मी वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी निव्वळ मतांसाठी खोटी आश्वासने देऊन निवडणूक जिंकण्याचा स्टंट करू नये. जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका आता बदलत चालली असून त्यांनी जनतेची दिशाभूल थांबवून आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.