शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘नगरपंचायत’चा बिगुल वाजणार

By admin | Updated: June 28, 2016 22:44 IST

देवगड-जामसंडे निवडणूक : प्रभाग रचना, आरक्षण, सोडतीचा कार्यक्रम नगरविकासकडून जाहीर

अहमदनगर : केडगाव येथील सावली संस्थेतील निराधार, अनाथ मुलांच्या कौशल्यवृद्धी व रोजगार निर्मितीसाठी संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पतरू शैक्षणिक संकुलाचे मंगळवारी डॉ़ संजय उपाध्ये यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ चरखा व तीस हजार रुपयांची देणगी देऊन उपाध्ये यांनी उद्घाटन केले़ या प्रकल्पात समाजातील निराधार, वंचित, अनाथ, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले, आई-वडील सोडून गेलेल्या मुलामुलींसाठी निवासी कल्पतरू शैक्षणिक संकुल उभे राहणार आहे. या संकुलात सेंद्रीय शेती, चरखा प्रशिक्षण, सुतार काम, वेल्डिंग, पेंटिंग, प्लंबिंग, फूड प्रोसेसिंग व विविध आद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यावेळी उपाध्ये म्हणाले, आजपर्यंत सावली संस्थेने निराधार मुलांच्या स्वावलंबनासाठी गेल्या पंधरा वर्षांत व्यापक काम केले आहे़ आजपर्यंत शेकडो मुलांना सावलीचा आधार मिळाला आहे़ मुलं चांगले आयुष्य जगत आहेत. निराधार, वंचित मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी स्वविकास, स्वावलंबन व श्रमसंस्कारातूनच समाज विकास होईल. समाजाला प्रेरणा देणारे कार्य सावलीमध्ये होत आहे. समाजातील निराधार मुलांना कुटंुब व मुलांचे अधिकार न मिळाल्याने ही मुले शोषणाला बळी पडतात, अथवा गुन्हेगारीकडे वळतात. कल्पतरू शैक्षणिक संकुलामुळे ही मुले स्वत:च स्वावलंबी होऊन चांगले नागरिक बनतील, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय मादगीकर यांनी केले. कल्पतरू शैक्षणिक संकुलाची जबाबदारी सावलीतील माजी विद्यार्थी तुषार देशमुख, विशाल चव्हाण, मोनिका पैठणपगारे, राहुल कांबळे, एकनाथ भुजबळ, प्रवीण चव्हाण हे पाहणार आहेत. कल्पतरू शैक्षणिक संकुलासाठी शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत तीन एकर जागेची आवश्यकता असून दानशूर व्यक्तींनी या कार्यात सहभागी होऊन जमिनीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. प्रास्ताविक नितेश बनसोडे यांनी केले. आभार राहुल कांबळे यांनी मानले.