शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

अनैतिक संबंधातून पतीचा खून- सांगाड्याचे रहस्य उलघडले

By admin | Updated: July 29, 2014 23:03 IST

प्रियकराची घेतली साथ, खुनाला वाचा फुटली

देवगड : अनैतिक संबंधांना अडथळा होत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला. त्यानंतर दोघांनी संगनमताने पतीचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकून दिला. इतरांना संशय येऊ नये म्हणून पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली. परंतु शेवटी खुनाला वाचा फुटली. घटनेनंतर तीन वर्षांनी पोलीस तपासात मुरूगेश कृष्णन गवंडर याचा सांगाडा शिरगांव परिसरातील बंगल्याच्या शौचालयाच्या टाकीमध्ये पोलिसांना आढळला. ही सर्व बाब उघड झाली.या घटनेतील पत्नी भारती मुरूगेश गवंडर ही काही वर्षापूर्वीच मृत झाली आहे. मात्र पोलीस आता प्रियकर व आरोपी नं. २ दत्ताराम पंधारे याचा शोध घेत आहेत.कर्नाटक येथील रंगनेल्ली गावातील इंद्रानगर तरीकेरे या चिकमंगळूर जिल्ह्यातील मुरूगेश गवंडर हा हरहुन्नरी कामगार होता. तो खलाशी म्हणूनच देवगड बंदरात काम करीत असे व शिरगांव परिसरात घर करून राहत होता. त्याची पत्नी भारती गवंडर ही सुद्धा त्याच्यासोबत राहत होती. दरम्यान, कुडाळ तालुक्यातील आंगिवडे पंधारेवाडी येथील दत्ताराम पंधारे याच्याबरोबर भारती हिचे अनैतिक संबंध होते. परंतु त्यांना मुरूगेशचा अडथळा वाटू लागला. त्यामुळे अखेर दोघांनी ३ जानेवारी २०१० चे पूर्वी एका दिवशी मुरूगेश याला एकटे गाठून त्याच्या डोक्यात दगडी पाटा घालून त्याला ठार मारले. परंतु त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी राहत असलेल्या घराजवळच एका शौचालयाच्या टाकीत मृतदेह टाकले. तसेच इतर लोकांना व नातेवाईकांना संशय येऊ नये म्हणून मुरूगेश खलाशी कामावर असताना बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलीस स्थानकात दिली.मात्र याबाबत पोलिसांना वेगळाच संशय येत होता. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेऊन याबाबतची बातमी मिळविण्यात पोलीस यशस्वी झाले. संशयावरून याच शौचालयाच्या टाकीजवळ खोदकाम केल्यावर एक मानवी सांगाडा त्याना आढळला. सखोल चौकशी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी मुरूगेशच्या जवळच्या नातेवाईकांचीही मदत घेतली. त्यावेळी त्याची पत्नी भारती ही अगोदरच मृत झाली असल्याचे स्पष्ट झाले. चौकशी दरम्यान पुतण्या शणमुगम कृष्णन आदी द्रवीड गवंडर यानेही सहकार्य केले व तक्रार दिली. चौकशी सुरू झाल्यानंतर दत्ताराम पंधारे याचा शोध सुरू करण्यात आला. परंतु तो त्याच्या राहत्या ठिकाणी आढळून आला नाही. मात्र पोलिसांनी मुरूगेशची पत्नी भारती गवंडर व दत्ताराम पंधारे यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी देवगड पोलीस निरीक्षक अरविंद बोडके तपास करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जायपत्रे, आर. बी. पाटील, सुरेश पाटील, पी. आर. सावंत, अनंत भांड्ये हे पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)