शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

शवविच्छेदनातून उलगडले खुनाचे रहस्य

By admin | Updated: June 28, 2015 00:36 IST

न्हावेलीतील प्रकार, चौकशीसाठी मुलगा ताब्यात

सावंतवाडी : न्हावेली-विवरवाडी येथील पास्तू किस्तू फर्नांडिस (वय ५५) यांचा डोक्यात जड वस्तूने प्रहार करीत खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडला असून, शनिवारी ही घटना उघडकीस आली. सुरुवातीला पोलिसांना अपघात असे सांगण्यात आले होते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, पण नंतर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हा खून असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी पास्तू यांचा लहान मुलगा सालू फर्नांडिस याला ताब्यात घेतले आहे. न्हावेली-विवरवाडी येथे पास्तू फर्नांडिस पत्नी व दोन मुलांसह राहत होते. यातील सालू हा गोव्यात वेल्डिंगचे काम करतो. जॉकी हा मोठा मुलगा गोवा न्हावेली येथे किराणा दुकानात कामाला आहे. पास्तू यांची पत्नी आजारी असून तिला ऐकायलाही येत नाही. पास्तू यांना दारूचे व्यसन असल्याने ते नेहमी मद्यपान करीत असत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सालू व त्याच्या आईने एकत्रित जेवण केले. त्यानंतर पास्तू यांनी आपण जरा बाहेर जाऊन येतो, असे सांगितले; परंतु ते उशिरापर्यंत आले नाही. पास्तू यांचा मुलगा व त्याची आई आतील खोलीत झोपतात. पास्तू हे बाहेरच्या खोलीत झोपतात. त्यामुळे ते केव्हा झोपले हे घरातील व्यक्तींना माहीत नव्हते. सकाळी पास्तू यांना पत्नी उठवण्यासाठी गेली असता पास्तू यांच्या तोंडातून फेस येत होता. त्यानंतर तातडीने गोवा येथे असलेला मुलगा जॉकी याला बोलावण्यात आले. सुरुवातीला पास्तू यांचा अपघात झाला असावा, असा संशय सर्वांना होता. पोलिसांनाही बोलावण्यात आले होते. पोलिसांनी नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा प्रकार उघडकीस घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पास्तू यांचा मृतदेह मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या तपासणीवेळी पास्तूंच्या डोक्याच्या मागच्या बाजूस जड वस्तूने प्रहार केल्याचे तपासात पुढे आले. तसेच तोंडावरही वार करण्यात आला होता, असे शवविच्छेदन अहवालात दिसून आले. खुनाचा गुन्हा दाखल शवविच्छेदन अहवालात खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पास्तू यांचा मोठा मुलगा जॉकी याने पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीत कोणाची नावे दिली नाहीत. मात्र, पोलीस तक्रारदार जॉकी याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होते. मुलग्यावर संशय पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर पास्तू यांचा लहान मुलगा सालू याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याने सांगितले की, मी वडिलांबरोबर बोलत नव्हतो हे खरे आहे, पण त्यांना मारले नाही, मी त्यांना जेवणासाठी विचारले, पण ते न जेवताच माझे मी बघतो असे म्हणत घरातून बाहेर पडले होते. ते रात्री उशिरापर्यंत आले नसल्याचे त्याने सांगितले. याबाबत पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांना विचारले असता, आम्ही अद्याप चौकशी करीत असून आरोपीला लवकर ताब्यात घेऊ.