शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

‘स्नेहज्योती’मुळे संगीत डोळस

By admin | Updated: January 7, 2016 00:52 IST

अंध विद्यार्थ्यांचा सहभाग : ‘खल्वायन’ची मासिक संगीत सभा

रत्नागिरी : ‘खल्वायन’ची सलग २१५वी मासिक संगीत सभा दि. ९ जानेवारी रोजी होणार आहे. या सभेमध्ये स्नेहज्योती अंध विद्यालयातर्फे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम गोदुताई जांभेकर विद्यालयात सायंकाळी ७ वाजता होणार आहे. स्नेहज्योतीचे संगीत शिक्षक व विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारे मनिष व्याघ्रांबरे हे एम. ए. संगीत, तबला विशारद असून, त्यांचे सुगम रत्नपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या ते संगीत शिक्षक म्हणून स्नेहज्योतीमध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी ते नागपूर, अकोला येथे १५ वर्षे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. गणेश काकडे हे संगीत विशारद असून, तबला व हार्मोनियमच्या दोन परीक्षा पास झाले आहेत. स्नेहज्योतीत ते संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते पुणे येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियममध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते.या कार्यक्रमात सहभागी होणारे राकेश सोळंकी हे तबला शिक्षक आहेत. ते उपांत्य विशारद तबला व गाण्यांच्या दोन परीक्षा पास झाले आहेत. आशिका शेडगे ही मध्यमा गायन, तबल्याच्या दोन परीक्षा व उत्कृष्ट हार्मोनियम प्लेअर आहे. ती इयत्ता ९वी मध्ये शिकते तर संजना वाळणकर ही गायनाच्या तीन परीक्षा, उत्कृ ष्ट तबला व हार्मोनियम प्लेयर असून, ती इयत्ता १०वीत आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)