शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

दोन परप्रांतीय कामगारांचा खून; दोघांना अटक

By admin | Updated: January 20, 2017 22:55 IST

अनैतिक संबंधातून घटना : रोणापाल येथील जंगलात आढळले मृतदेह; सर्वजण केरळ राज्यातील

बांदा : आपल्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून आपल्या सहकाऱ्याला विचारणा केल्याने रोणापाल-साखरमैना येथील जंगलात झोपडीत राहणाऱ्या परप्रांतीय कामगारांमध्ये वाद झाले. त्यातील दोघाजणांचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. ही घटना रोणापाल गावापासून सुमारे ४ कि.मी. अंतरावर जंगलात घडली. बांदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी खून करून फरार झालेल्या दोघांना पेडणे रेल्वे ट्रॅकवरून शिताफीने ताब्यात घेतले. बांबूची तोड करणाऱ्या व्यापाऱ्याकडे हे कामगार काम करणारे असून, दोघांनी खुनाची कबुली दिली आहे.यामध्ये रेवी (वय ४0) व चंद्रन (४५) (दोघे रा. आर्लम पार्क, जि. कन्नूर, केरळ) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. बांदा पोलिसांनी तेथीलच झाडीत लपून बसलेल्या संतोष (४0) व केरळ येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेला मुख्य संशयित साजी (४२) याला पेडणे रेल्वे ट्रॅकवरून ताब्यात घेतले. खुनाची घटना घडण्यापूर्वी झटापटीत उर्वरित दोन मृत रेवी याने साजीला आपल्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाचा जाब विचारला. मद्यप्राशन केल्याने दोघांमध्ये प्रचंड वाद झाला, त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. साजी याने धारदार कुुदळीच्या साहाय्याने रेवी याच्या मानेवर घाव घातला. तसेच त्याच्या अंगाचा ठिकठिकाणी चावा घेतला. यामध्ये रेवी याचा जागीच मृत्यू झाला. साजी व रेवी यांच्यातील भांडणे सोडविण्यासाठी गेलेला चंद्रन याच्या देखील डोक्यावर कुदळीने वार केल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. या खून प्रकरणात संतोष याने साजीला मदत केली. दोघांवर वार करताना संतोष याने दोघांना पाठीमागून घट्ट पकडले होते. यावेळी साजी याने उर्वरित दोघे कामगार असलेले मोहन व गोबालन यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. हे प्रकरण शुक्रवारी उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस, बांदा पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, एलसीबीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे, उपनिरीक्षक सचिन नावडकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.पोलिसांनी दुभाषीच्या मदतीने माहिती घेतलीखून प्रकरणात जखमी झालेले परप्रांतीय कामगार हे केरळीयन असल्याने त्यांना केवळ केरळीयन भाषा येत होती. त्यामुळे पोलिसांसमोर भाषेचा अडसर निर्माण झाला. बांदा येथील केरळ व्यावसायिक असलेले राजेंद्र यांना पोलिसांनी पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी दुभाषीच्या मदतीने घटनेची सविस्तर माहिती घेतली.झोपडीच्या बाहेर रक्ताचा सडापरप्रांतीय कामगारांच्या झोपडीबाहेर दोघांचा खून करण्यात आल्याने रक्ताचा सडा पडला होता. रेवी याचा झोपडीच्या दारातच खून करण्यात आला. त्याच्या मानेवर व पोटावर खोलवर वार करण्यात आला होता. त्यानंतर झोपडीपासूून १०० फूट अंतरावर पाठलाग करून चंद्रन याचा खून करण्यात आला. चंद्रन याच्या उजव्या खांद्यावर व डोक्यावर खोलवर वार करण्यात आला. खुनासाठी साजी याने कुदळ व कोयत्याचा वापर केला होता. खून केल्यानंतर त्याने कुदळ व पार जवळच्याच झाडीत फेकून दिले होते. पोलिसांनी दोन्ही हत्यारे उशिरा ताब्यात घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. घटनास्थळी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.दोघा संशयितांना घेतले ताब्यातघटनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर बांदा पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरविली. दुसरा संशयित असलेला संतोष हा घटनास्थळापासून जवळच असलेल्या झाडीत लपूून बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र तो असंदिग्ध माहिती देत होता. मुख्य संशयित असलेला साजी याला पेडणे येथे रेल्वे ट्रॅकवरून ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी सकाळी तो प्रथम मडुरा रेल्वेस्थानकावर गेला. तेथे सुनील मडुरकर यांच्याकडून त्याने पिण्यासाठी पाणी घेतले, तसेच केरळ येथे जाणाऱ्या रेल्वेची चौकशी केली. तो ट्रॅकवरून गोव्याच्या दिशेने चालत निघाला. मडुरकर यांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती बांदा पोलिसांना दिली.