शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

इंग्लंडच्या पर्यटकांची मुंबई-कोकण सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 23:48 IST

देवगड : देवगड येथे परदेशी पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर व देवगड बीचवर पर्यटकांची वर्दळ ...

देवगड : देवगड येथे परदेशी पर्यटकांचा ओघ वाढू लागला असून विजयदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर व देवगड बीचवर पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. इंग्लंड येथील परदेशी ५० पर्यटक मुंबईतून सायकलवरून प्रवास करीत सोमवारी ५व्या दिवशी देवगड येथील हॉटेल डायमंड येथे दाखल झाले आहेत. सायकलवरून प्रवास करून आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी संदेश देत आहेत.देवगडमधील निसर्ग पाहून व मालवणी जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी अभिप्राय लिहिताना नमूद केले की, आतापर्यंतच्या प्रवासातील अतिशय सुुंदर स्थळे व सुंदर जेवण देवगडमध्येच मिळाले आहे.देवगड तालुक्यामध्ये अनेक निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत. गेल्या पाच वर्षांत देवगडमधील पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून विकास होऊन देशी पर्यटकांबरोबर परदेशी पर्यटकांचा ओढा देवगडकडे वाढू लागला आहे.इंग्लंडमधील पर्यटक मुंबईवरून पाच दिवसांचा सायकलवरून प्रवास करीत देवगड येथे सोमवारी दाखल झाले. सायकल चालवून आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संदेश देत त्यांनी येथील पर्यटनाबरोबर मालवणी जेवणाची तोंड भरून स्तुती केली.५० परदेशी पर्यटक या टिममध्ये असून ते मुंबई ते गोवा असा सायकलने प्रवास करीत आहेत. हे पर्यटक देवगडमध्ये दाखल झाल्यानंतर सुप्रसिद्ध हॉटेल डायमंड येथे मालवणी जेवणाचा त्यांनी आस्वाद घेतला. त्यानंतर ते मालवणमार्गे गोव्याच्या दिशेने सायकल प्रवास करीत रवाना झाले आहेत. पर्यटकांना चांगली सेवा दिल्याबद्दल डायमंड हॉटेलचे मालक गौरव पारकर यांचे पर्यटकांनी कौतुक केले.