शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिंद धरणात पाण्यापेक्षा गाळ जास्त

By admin | Updated: May 12, 2015 23:41 IST

१८ वर्षांपासून गाळ जैसे थे : शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; वांग नदीत पाणी सोडण्यावर मर्यादा

सणबूर : ढेबेवाडी विभागाला वरदान लाभलेल्या वांग नदीवरील महिंद धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. १८ वर्षांपासून या धरणातील गाळ न काढल्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त गाळाने धरण भरल्याने धरणात अतिशय कमी प्रमाणात पाणीसाठा होत आहे. महिंद धरणामध्ये १८ वर्षांपूर्वी पाणी अडवायला सुरुवात झाली. ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेच्या या धरणाचे लाभक्षेत्र बनपुरी गावापर्यंतच आहे. या धरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटायला काही प्रमाणात मदत होत आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात कृष्णा खोरे विकास महामंडळाने बंधारे बांधले आहेत. मात्र धरणातच पाणी कमी असल्याने या बंधाऱ्यात पाणी साठवता येत नाही. उन्हाळ्यात या विभागातील लोेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. धरणातून पाणी सोडले गेले तर ही वेळ येणार नाही हे खरे आहे मात्र धरणातील गाळ न काढल्यामुळे धरणातच अतिशय कमी प्रमाणात पाणीसाठा होत असल्याने पाणी कसं सोडायच, हाही प्रश्न धरण प्रशासनासमोर आहे. मात्र त्यांनी यावर तोडगा काढण्याची गरज आहे. महिंद धरणातील गाळ काढून धरणाची थोडी उंची वाढवावी, तसेच विभागातील लोकांना पाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या धरणाचे पाणी याच विभागातील लोकांना मिळत नसेल तर या धरणाचा उपयोग काय? असा प्रश्न विभागातील जनता करीत आहे. (वार्ताहर) महिंद धरणातील गाळ काढला तर धरणातील पाणीसाठा वाढेल शिवाय उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न जाणवणार नाही. यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने नियोजन करून धरणातील गाळ काढण्याची गरज आहे. तरच धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. - संजय लोहार, उपसरपंच,मंद्रुळकोळे खुर्द पाझर तलावही कोरडेढेबेवाडी विभागातील अनेक गावात पाझर तलावांचे जाळे आहे. या तलावात पाणीसाठा झाल्यानंतर नजीकच्या विहिरींची पाणी पातळी वाढते. मात्र, सध्या पाझर तलावांची अवस्थाही बिकट आहे. तलावामध्ये पाण्यापेक्षा गाळ जास्त प्रमाणात असल्याने पावसाळ्यात तलावामध्ये कमी प्रमाणात पाणी साचते. नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर हा पाणीसाठा राहतो. त्यानंतर तलावही कोरडे पडतात. परिणामी, परिसरातील गावांचा पाणीप्रश्न अधिकच गंभीर होतो.