शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराएवढेच खेळाला महत्त्व द्या  संगीता राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 18:21 IST

मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासात पोषण आहाराएवढेच खेळाला महत्त्व आहे. यामुळे अंगणवाडी व बालवाडीतील मुलांना केवळ पाटी-पेन्सिल यात मग्न न ठेवता त्यांच्यासाठी मुक्तांगण निर्माण करून त्यांच्यातील

ठळक मुद्देतुळस येथे बालविकास सेवा सप्ताह 

वेंगुर्ले : मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासात पोषण आहाराएवढेच खेळाला महत्त्व आहे. यामुळे अंगणवाडी व बालवाडीतील मुलांना केवळ पाटी-पेन्सिल यात मग्न न ठेवता त्यांच्यासाठी मुक्तांगण निर्माण करून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देत त्यांचा सर्वांगीण विकास साधा, असे आवाहन गोवा येथील खाद्य तथा पोषण आहार विभागाच्या अधिकारी संगीता राणे यांनी केले.

गोवा सामुदायिक खाद्य तथा पोषण आहार बोर्ड, महिला आणि बालविकास मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास कार्यालय वेंगुर्ला यांच्यातर्फे तुळस येथील कुंभारटेंब अंगणवाडी येथे बालविकास सेवा सप्ताह आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी त्या उपस्थित अंगणवाडी सेविका व  पालकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. 

यावेळी व्यासपीठावर  गोवा येथील महिला व बालविकास विभागाच्या नीता राणे, बालविकास प्रकल्प अधिकारी  मेस्त्री, आर्या देऊलकर, तुळस उपसरपंच तेजस्विनी ठुंबरे, अंगणवाडी मुख्यसेविका आदी उपस्थित होते.केंद्र आणि राज्य महिला व बालविकास विभागाच्यावतीने महिला व बालविकास सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत वेंगुर्ला महिला व बालविकासतर्फे या कार्यक्रमाचे उद्घाटन तुळस येथील कुंभारटेंब अंगणवाडीत करण्यात आले. 

या सेवा सप्ताहादरम्यान तुळस येथील सिद्धार्थनगर, होडावडा, आरवली, शिरोडा येथील काही अंगणवाड्यांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  उपस्थित पालक व अंगणवाडी सेविकांना नीता राणे यांनी पोषण आहारविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. अंगणवाडीतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने वेशभूषा, चित्रकला, गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 

महिला व बालविकास सेवा सप्ताहावेळी अधिकारी संगीता राणे, नीता राणे, अंगणवाडी सेविका आणि वेशभूषा स्पर्धेतील सहभागी स्पर्धक उपस्थित होते.