शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमी न दिल्यास आंदोलन,तानाजी कांबळे यांचा इशारा

By admin | Updated: May 24, 2017 21:25 IST

कणकवली तालुक्यातील चिंचवली येथे दलितवस्तीला प्रशासनाने तातडीने स्मशानभूमी उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन

ऑनलाइन लोकमत
कणकवली (सिंधुदुर्ग), दि. 24 - कणकवली तालुक्यातील चिंचवली येथे दलितवस्तीला प्रशासनाने तातडीने स्मशानभूमी उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया(ए)चे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांनी दिला आहे. 
दरम्यान, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी कणकवली तहसीलदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली आहे.
याबाबत प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात त्यानी  म्हटले आहे की, 23 मे रोजी आपण चिंचवली येथे भेट दिली. यावेळी समाज मंदिरात तेथील ग्रामस्थानी आपले स्वागत करण्याबरोबरच सत्कारहि केला. तसेच त्यांच्या समस्या आपल्याकडे  ग्रामस्थानी मांडल्या. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नारायण कुसुरकर, अजय सावडावकर, सुनील तांबे, प्रदीप कांबळे, धीरज आचरेकर, अमोल पडेकर, संदेश सावडावकर, प्रमोद जाधव, यांच्यासह चिंचवली बौद्धविकास मंडळाचे रविंद्र कांबळे, दीपक पवार, भास्कर कांबळे, सचिन पवार, रत्नमाला कांबळे, शीला पवार ,मनोज कांबळे आदी उपस्थित होते. 
या समस्यांमध्ये प्रामुख्याने स्मशानभूमिच्या समस्येचा समावेश होता-

ऊस लागवडीमुळे चिंचवली येथील आंबेडकरी अनुयायांची स्मशानभूमी संपुष्टात आली आहे. त्या गावात मराठा समाजाच्या लोकांनी स्वतःपुरती स्मशानभूमी निर्माण केली आहे. या स्मशानभूमित आंबेडकरी समाजाला प्रेत जाळण्यास यापूर्वीच गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे.चिंचवली  ग्रामपंचायतीने तयार केलेली संबधित स्मशानभूमीच आंबेडकरी अनुयायाना देण्यात यावी. तसेच गावकऱ्यांसाठी दुसऱ्या ठिकाणी नव्याने स्मशानभूमि निर्माण करावी. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचेही तानाजी कांबळे यांनी प्रसिध्दि पत्रकात म्हटले आहे.