शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चळवळ केवळ जात, आरक्षणापुरती नको

By admin | Updated: February 8, 2015 01:00 IST

प्रकाश आंबेडकर : वणंदमध्ये रमाई स्मारकाचे उद्घाटन

दापोली : आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भावनिकदृष्ट्या घराघरांत पोहोचले. मात्र, आता या चळवळीचा प्रवास केवळ जात आणि आरक्षण इथपर्यंत मर्यादित न ठेवता तो व्यापक झाला पाहिजे. त्यामुळे यापुढे लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिकदृष्ट्या ओळखायला हवे. त्यांचे विचार लोकांनी आत्मसात करायला हवेत, असे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. दापोली तालुक्यातील वणंद येथे शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांच्या जगातील पहिल्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी लाखो आंबेडकरांच्या अनुयायांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूनबाई मीरा आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. संपूर्ण राज्यातून अपेक्षेपेक्षा जास्त कार्यकर्ते वणंद येथे आल्याने दापोली परिसराला चैतन्यभूमीचे स्वरूप आले होते. समाजाने यापुढे निव्वळ आरक्षणाच्या भरवशावर न राहता ही आरक्षणे बंद होणार हे लक्षात घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला हवे. यासाठी शिक्षण, उद्योग व्यवसायामध्ये जास्तीत जास्त सहभाग वाढायला हवाय. काही विरोधक समाजात फूट पाडून स्वार्थ साधायचा प्रयत्न करतात, त्यांना दूर ठेवायला हवे. आंबेडकरी विचारांची चळवळ प्रत्येक कार्यकर्त्याने झोकून देऊन वाढवायला हवी, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळ आणि स्मारके बांधण्याची कामे केवळ आंबेडकर नावाच्या माणसांनीच करावयाची काय? असा प्रश्न करीत आंबेडकरांच्या नावाचा वापर स्वार्थासाठी करणाऱ्या इतरांनीही काहीतरी करायची जबाबदारी घ्यायला हवी, असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात या स्मारकाचे उद्घाटन मीरा आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी)