शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरमध्ये आंदोलन

By admin | Updated: August 30, 2015 00:33 IST

मागण्यांकडे दुर्लक्ष : ७ पासून बेमुदत संप

रत्नागिरी : चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांची खासगी भरती रद्द करणे, अनुकंपा तत्त्वावरील सेवाभरती विनाअट करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तसेच वैद्यकीय कारणास्तव अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास सेवेत सामावून घेणे, यांसह एकूण २४ मागण्या शासनाने प्रलंबित ठेवल्याने लढा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा एकवटले आहेत. या मागण्यांचा विचार झाला नाही, तर येत्या १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ७ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या सेवेतील सर्वांत कमी वेतन घेणारा वर्ग म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. मात्र, शासनाने त्यांना सहाव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र रचले असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत ३० टक्के चतुर्थ श्रेणी कर्मचारी अतिरिक्त ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अतिरिक्ततेची टांगती तलवार आहे. यांसह कित्येक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांनी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या लढ्याला येत्या १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण १ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. २ सप्टेंबरला लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. ३ व ४ सप्टेंबरला दुपारी २ वाजता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. तर ५ सप्टेंबरला सकाळी १० ते १२ या वेळेत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा संघटनेने जिल्हा दौरा करून तालुकावार कार्यकारिणी बांधणी केली आहे. १ सप्टेंबरपासून सुरू होणारे हे आंदोलन १०० टक्के यशस्वी करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेचे सचिव महंमद पठाण यांनी केले आहे. (प्रतिनिधी)