शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘तळकट’मध्ये हत्ती सोडल्यास आंदोलन

By admin | Updated: April 23, 2015 00:41 IST

एकनाथ नाडकर्णी : वनविभागाच्या निर्णयाला विरोध

कसई दोडामार्ग : कुडाळ-आंबेरी येथील जंगली हत्तींना पकडून त्यांना प्रशिक्षित करताना गणेश हत्तीचा अचानकपणे मृत्यू झाल्याने धास्तावलेल्या वनविभागाने या हत्तींना सोडण्याचा निर्णय घेतला. हे हत्ती दोडामार्ग तालुक्यातील तळकट वनबागेत सोडण्याचा निर्णय घेतल्याने तळकट पंचक्रोशीतील बागायतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी यांनी तळकट बागेत हत्ती सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तळकट दशक्रोशी सुपारी, नारळ आदींच्या उत्पन्नाने संपन्न आहे. पाण्याचा बिकट प्रश्न आहे. तळकट वनबाग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. ही बाग लोकवस्तीत आहे. या बागेत वनौषधी झाडे, आंबा, नारळ, मसल्याची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ही बाग हत्ती स्थलांतर करण्यासाठी योग्य नाही. खाद्य अपुरे पडणार आहे. त्यामुळे हत्ती सोडल्यास उपासमारीची वेळ येणार आहे. तसेच येथील बागायती उद्ध्वस्त करणार. या बागायती येथील मुख्य व्यवसाय आहेत. त्यामुळे हत्ती येथे सोडण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. (वार्ताहर)परिसरात वाघाचाही संचारतळकट बागेत वाघाचा संचार असून एकाला जखमीही केले आहे. असे असताना वनविभागाने वाघाचा बंदोबस्त केला नाही. वाघाचा बंदोबस्त करता येणार नाही. परंतु जखमींना मदत दिली जाईल, असे सांगितले. प्रथम वाघ आहे, हे वनविभागाने नाकारले आणि नंतर वाघ असल्याचे फलक लावले. असे असताना तळकट वनबागेत जंगली हत्ती सोडण्यात येणार आहेत, असे समजले. या भागात बागायती आहे. त्यामुळे येथे हत्ती सोडण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच रमेश शिद्धे, फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विजयकुमार मराठे यांनी तळकट दशक्रोशीच्यावतीने दिला आहे.