शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘धावण्यासाठी’ डॉक्टरांची चळवळ

By admin | Updated: February 10, 2017 22:43 IST

सदृढ आरोग्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे, असा सल्ला देणारे डॉक्टर हेही आपल्या जीवनात व्यायामाला सर्वात जास्त महत्त्व देत आहेत.

- रजनीकांत कदम/ऑनलाइन लोकमत

कुडाळ, दि. 10 - सदृढ आरोग्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे, असा सल्ला देणारे डॉक्टर हेही आपल्या जीवनात व्यायामाला सर्वात जास्त महत्त्व देत आहेत. धावणे हा सुंदर व्यायाम असून याबाबत प्रचार, प्रसार व जनजागृती करण्याकरिता कार्यरत असणारे काही डॉक्टर आपले आरोग्य चांगले रहावे, याकरिता दररोज पहाटे नियमित धावतात. ही धावण्याची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत असून, १२ फेबु्रवारी रोजी पहाटे कणकवली येथे जिल्ह्यातील ८० डॉक्टर धावणार आहेत. खरे पाहता धावणे हा विषय आपल्याला सहज व फार लहान विषय वाटून जातो. मात्र, ‘धावणे’ या तीन अक्षरात आरोग्य चांगले ठेवण्याची मोठी ताकद आहे, हे या डॉक्टरांच्या चळवळीने दाखवून दिले आहे. खरे पाहता त्यांची ही चळवळ प्रसिध्दीपासून दूरच राहिली. पण या चांगल्या चळवळीचा प्रचार व प्रसार होणेही गरज असून, त्यासाठी केलेला हा प्रयत्न. प्रत्येक डॉक्टर आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सकस आहार घ्या, नियमित व्यायाम करा असा सल्ला देत असतात. आपल्याला सल्ला देणारे हे डॉक्टर आपल्या व्यस्त अशा दिनक्रमातून स्वत: कधी व्यायाम करत असतील, असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. या प्रश्नाच्या आधारे जिल्ह्यातील काही डॉक्टरांकडे याबाबत माहिती घेतली असता, जिल्ह्यातील बहुतांश डॉक्टर हे नियमित व्यायाम करतात. आता यामध्ये पाहिले असता, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून काही डॉक्टरांनी व्यायामाच्या दृष्टीकोनातून धावणे हा व्यायाम प्रकार सुरू केला. बघता बघता आता या धावणे व्यायाम प्रकाराला जिल्ह्यातील डॉक्टर पसंती देत आहेत. ही चळवळ फक्त डॉक्टरांपुरती मर्यादित न राहता त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचली आहे. या धावण्यामध्ये डॉक्टरांचे कुटुंबियही मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभागी होत आहेत. गेल्या तीन वर्षात या धावण्याच्या चळवळीत सहभागी झालेल्या डॉक्टरांची तालुकावार संख्या पाहता माहिती मिळते की, कुडाळ-सावंतवाडी येथील ६७, वेंगुर्ले-३५, कणकवली-७०, मालवण-३२, देवगड-३५ तसेच इतर तालुक्यातील या सरासरीत आकडेवारी आहे. दरवर्षी ही आकडेवारी वाढतच जात आहे. १२ फेब्रुवारी रोजी पहाटे कणकवली येथील रेल्वे स्टेशन रोड ते मुडेश्वर मैदान व तेवढेच अंतर परत असे अंतर जिल्ह्यातील ७० ते ८० डॉक्टर धावणार आहेत. धावणे हाच व्यायाम प्रकार का निवडला, असे एका डॉक्टरांना विचारले असता, धावणे हा व्यायाम प्रकार सहज शक्य आहे.विशेष म्हणजे धावण्यासाठी विशेष साहित्य, मैदान व इतर खेळाला अथवा व्यायाम प्रकाराला साहित्य लागते तसे कोणतेही साहित्य याला लागत नाही. त्यामुळे धावणे सहज शक्य होते. सात वर्षांपूर्वी जिल्ह्यातील काही डॉक्टरांनी धावणे हा प्रकार सुरू केला. त्यानंतर याचा प्रचार, प्रसार झपाट्याने वाढत गेला असून, याचा परिणाम म्हणून काही डॉक्टर तर आता २१ किलोमीटर म्हणजे हाफ मॅरेथॉनचे अंतर दररोज पूर्ण करीत आहेत.